20 April 2025 7:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News

Highlights:

  • Home Loan Alert
  • क्रेडिट स्कोर सुधारण्याकडे लक्ष द्या :
  • हमीदार ठेवा :
  • एनबीएफसीचा विचार करा :
  • सरकारी योजनांचा शोध घ्या :
  • तुमचे डाऊन पेमेंट वाढवा :
Home Loan Alert

Home Loan Alert | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी घर खरेदी करणेही एक मोठी स्वप्नपूर्ती असते. व्यक्तीला स्वतःच्या हक्काचं घर खरेदी करता यावं यासाठी तो दिवस-रात्र मेहनत घेतो. परंतु काही शिल्लक कारणांमुळे त्याचा होमलोन अर्ज फेटाळण्यात येतो. याची बरीच कारणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा होम लोन अर्ज रिजेक्ट होण्याची शक्यता कमी होईल. तुम्हाला देखील चटकन लोन मिळेल आणि तुमच्या देखील घराची स्वप्नपूर्ती पूर्ण होईल.

क्रेडिट स्कोर सुधारण्याकडे लक्ष द्या :
तुमचा क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर कमी असेल तर बँकांकडून तुमचे होम लोन अर्ज फेटाळण्यात येऊ शकते. बँकेला जास्तच क्रेडिट स्कोर असलेल्या व्यक्तीला गृह कर्ज देणे सुरक्षिततेचे वाटते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारणाकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्हाला 500 च्या वरती सिबिल स्कोर घेऊन जायचं आहे. यासाठी तुम्ही थकबाकी असलेले पेमेंट फटाफट भरून टाका आणि गृह कर्ज घेण्यासाठी मोकळे व्हा.

हमीदार ठेवा :
तुमची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तरीसुद्धा तुम्हाला होम लोनची नितांत गरज असेल तर, तुम्ही एखादा गॅरेंटेड व्यक्ती शोधा. हमीदार शोधल्यामुळे तुम्हाला लोन मिळण्यात सोपे जाऊ शकते.

एनबीएफसीचा विचार करा :
तुम्हाला लवकरात लवकर गृह कर्ज मिळवायचे असेल आणि बँकेने तुमचा अर्ज फेटाळला असेल तर तुम्ही नॉन बँकिंग म्हणजे ते NBFC चा विचार करू शकता. यामध्ये अतिशय लवचिक कर्जाची नियमावली असते. ज्यामुळे तुम्हाला चटकन कर्ज मिळण्यास मदत होते. परंतु या सगळ्यामध्ये तुम्हाला जास्तीचे व्याजदर भरावे लागू शकते.

सरकारी योजनांचा शोध घ्या :
प्रधानमंत्री आवास योजना ही योजना प्रथमच घर खरेदी करणाऱ्या व्यक्तींना सबसिडी प्रदान करते. तुम्ही अशा प्रकारच्या सरकारी योजनांचा शोध घेतला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला घरचा स्वप्न पूर्ण करण्यास स्फूर्ती मिळेल.

तुमचे डाऊन पेमेंट वाढवा :
बँका किंवा नॉन बँकिंग संस्था तुम्हाला होम लोन देण्यास नकार देत असतील तर, तुम्ही तुमचं डाऊन पेमेंट वाढवलं पाहिजे. जास्तीचं डाऊन पेमेंट पाहिल्यानंतर तुम्ही एक विश्वासू कर्जदार दिसाल. जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढेल.

Latest Marathi News | Home Loan Alert 03 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Home Loan Alert(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या