19 November 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

Home Loan EMI | ईएमआय चुकवला गेला तर मोठे नुकसान होते, गृहकर्ज वेळेत न भरल्यास येणा-या अडचणी अशा सोडवा

Home loan

Home Loan EMI | कोणतीही मोठी वस्तू खरेदी करताना सामान्य माणूस कर्ज घेत असतो. सरकारी नोकरी करणा-यांना नोकरीची जास्त चिंता नसते. त्यामुळे दरमहा त्यांचा प्रिमियम निट भरला जातो. मात्र खाजगी नोकरदार वर्गाला आपल्या नोकरीसाठी नेहमी चिंता असते. तसेच कर्जाचे हप्ते वेळेत भरण्यास मोठी मेहनत घ्यावी लागते. अशात एक जरी ईएमआय चुकवला गेला तर मोठे नुकसान होते. यात तुम्हाला अतिरीक्त व्याज द्यावे लागते.

आयुष्यात आर्थिक अडचण कधी येणार आहे याचा कुणाला काही नेम नसतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे कर्जात गुंतलेले असाल आणि ईएमआय भरण्यास उशिर होणार असेल तर तुम्ही कोणत्या उपाययोजना करायला हव्यात या विषयी जाणून घेऊ.

ईएमआय उशीरा भरल्यास होणारा परिणाम
ईएमआय भरण्यास उशीर झाला तर मोठा तोटा सहन करावा लागतो. याचा परिणाम फ्क्त तुमच्या अतीरिक्त व्याजावरच नाही तर इतर गोष्टींवर देखील होतो. जर तुम्ही ईएमआय उशीरा भरला तर तुमच्या ईएमआयच्या रकमेवर दोन टक्के दंड बसतो. जर एकदा असे झाल्यास तुमचे नाव मायनर डिफॉस्टमध्ये दाखल होते. यात दोन किंवा तीन पेक्षा जास्त महीने तुम्ही ईएमआय थकवला असेल तर तुम्ही थेट मोठ्या डिफॉल्टर लिस्टमध्ये जाता. याचा परिणाम सीबीलस्कोरवर स्पष्ट दिसतो. मायनरमध्येच सीबील स्कोर ४० ते ८० गुणांनी खाली येतो. यात एकदाच तुमच्याकडून ईएमआय भरण्यास उशीर झाला मात्र नंतर तुम्ही तो नियमीत वेळेत पुर्ण करत असाल तर तुमचा सीबील स्कोर पुन्हा वाढण्यास मदत होते. ईएमआय भरण्यास उशीर केल्यावर क्रेडीट स्कोर कमी होतो. तसेच क्रेडीट स्कोर घसरल्याने बॅंका पुन्हा चुम्हाला कर्ज देत नाहीत. जरी दिले तरी त्याचे व्याज जास्त आकारले जाते. कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक राहीला नाही तर बॅंक हे कर्ज तुमच्या मालमत्तेवर ताबा मिळवून वसूल करते.

ईएमआय भरण्यास अडचणी येत असतील तर या गोष्टी करा
हप्ता भरायला विसरलात
जर तुमच्याकडे पैसे आहेत मात्र तुम्ही बॅंकेचा हप्ता भरायला विसले असाल तर हे बॅंकेला लगेच कळवावे. असे केल्याने बॅंक लगेच तुम्हाला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकत नाही. तसेच ऑटेपे ऑप्शनचा पर्याय तुम्हाला उपलवध्द करुण देतात. यात तुम्ही नंतर पैसे भरायला विसरलात तरी तुमच्या खात्यातून हप्ता वजा केला जातो.

खरे कारण बॅंकेला सांगावे
जर तुमची नोकरी गेली असेल किंवा तुमच्यावर आणखीन कोणते आर्थिक संकट असेल तर याची माहिती बॅंकेत सांगावी. तसेच यावर उपाय म्हणून आपातकालीन निधीमध्ये किंवा काही योजनांमध्ये गुंतवलेला पैसा कर्ज फेडण्यासाठी वापरावा.

सवलतीची मागणी करावी
जर तुमच्याकडे कोणत्याही गुंतवणूकीतील पैसे नसतील तर बॅंकेकडे कर्ज फेडण्यास मुदत वाढवून मागा. अनेक बॅंका कर्जदाराला मुदत वाढवून देत मदत करत असतात. यावेळी तुम्ही तुमचे राहते घर भाड्याने देऊन लहान भाड्याच्या घरात राहू शकता. तसे केल्यास त्याच घराच्या भाड्यातून तुम्हाला ईएमआयचे हप्ते भरता येतील.

या गोष्टी पाळने अत्यंत महत्वाचे
* अतिरिक्तस खर्च टाळा.
* कुटुंबाचे आणि खर्चाचे निट नियोजन करा.
* बचत करण्यास स्वत:च्या मनाची तयारी करा.
* आर्थिक धोरण तयार करूण ते निट पाळा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Home Loan EMI non payment effect solutions need to know check details 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Home Loan(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x