24 December 2024 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

Home loan | सावधान! तुम्ही गृह कर्जाचा ईएमआय वेळेत भरला नाही तर, तुमचं घर जप्त होऊ शकतं

Home loan

Home loan | स्वप्नातलं घर घेण्यासाठी आज प्रत्येक व्यक्ती धडपड करत आहे. अनेक व्यक्ती स्वात: चे घर घेण्यासाठी वर्षानुवर्षे सेविंग करत असतात. मात्र सध्या घरांच्या किंमती अव्वाच्यासव्वा वाढल्या आहेत. त्यामुळे हे स्वप्न बचत करून पूर्ण होण्याजोगे नाही. असाच विचार करून आपल्या हक्काच्या घरासाठी अनेक व्यक्ती बेंकेकडे धाव घेतात. बॅंक देखील तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कर्ज देते. मात्र जर कर्ज थकले गेले तर सुंदर स्वप्नातील हेच घर तुमच्यकडून हिरावून घेतले जाते. वेळप्रसंगी बॅंक तुमच्यावर कारवाई देखील करू शकते.

या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणे फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही घर, गाडी अथवा अन्य महागड्या गोष्टी खरेदी करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेता तेव्हा तुम्हाला हमी द्यावी लागते. यात तुमची वस्तू हिच हमी असते. कर्जाची परतफेड न केल्यास बॅंक ती वस्तू अथवा जमिन जप्त करते. त्यामुळे कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत.

अशी होते कारवाई :
तुम्ही कर्ज घेतल्यावर काही कारणास्तव तुम्ही ते भरू शकत नसाल तसेच तुमचा एक हप्ता भरण्यास उशिर झाला असेल तर लगेच कोणतीही कारवाइ होत नाही. मात्र सलग तीन हप्ते बुडवल्यास बॅंक कारवाईला सुरूवात करते. यामुळे तुमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. सलग तीन हप्ते बुडवल्यास तुम्हाला नोटीस बजावली जाते. नोटीस देउन देखील तुम्ही ईएमआय भरला नाही तर बॅंक तुम्हाला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकून कर्जबुडवा घोषित करते.

परत कधीच कर्ज मिळत नाही :
कर्जाचा ईएमआय निट न भरल्यास तुम्ही डिफॉल्टर लिस्टमध्ये जाता. यात तुमच्या मालमत्तेवर जपती येते. त्यानंतर भविष्यात तुम्ही पैसे आल्यावर काही खरेदी करण्यासाठी पुन्हा कर्ज घेण्याचा विचार केला तर तुम्हाला कर्ज दिले जात नाही. जर दिलेच तर तुम्हाला जास्तीचा व्याजदर भरावा लागतो. त्यामुळे यात जास्तीचे पैसे वाया जातात.

लिलाव होण्याची शक्यता :
जेव्हा तुम्ही कर्ज भरू शकत नाही तेव्हा नोटीस आणि इतर बाबी पूर्ण झाल्यावर तुमच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्यात मिळणा-या पैशांतून बॅंकेचे कर्ज फेडले जाते. जर लिलावात कर्ज फेडले जात नसेल तर बॅंक तुमच्या मालमत्तेवर ताबा मिळवते. लिलाव करण्याआधी बॅंक एक रिमायंडर नोटीस देखील पाठवते. तारण ठेवलेली मालमत्ता बॅंकेकडे जाऊ नये यासाठी कर्ज वेळेत फेडणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Home loan if the house EMI is not paid on time, your property will be confiscated check details 14 October 2022.

हॅशटॅग्स

#Home Loan(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x