Hot Stocks | या शेअरने 1 महिन्यात 45 टक्के परतावा दिला, वेगाने गुंतवणुकीचा पैसा वाढतोय, स्टॉकचा तपशील जाणून घ्या

Hot Stocks | आजकाल शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि डिव्हिडंड वितरणाचा सपाटा लावला आहे. या व्यतिरिक्त शेअर बाजारात अनेक स्टॉक स्प्लिटच्याही बातम्या येत आहेत. अशीच एक कंपनी आहे जिने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ह्या कंपनीचे नाव आहे,”PerfectPack Limited”. कंपनीने नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच PerfectPack Limited कंपनीचे शेअर्स तेजीत वर जाऊ लागले. कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख 21 ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. चाल तर मग जाणून घेऊ, या स्टॉक स्प्लिटची सविस्तर माहिती.
स्टॉक स्प्लिटचे प्रमाण :
PerfectPack Limited कंपनीने SEBI नियामकांना दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, ‘कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की कंपनी एक शेअर 5 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. या विभाजनानंतर 10 रुपयांच्या एका शेअरचे मूल्य 2 रुपये होईल. या कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांनी स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख 21 ऑक्टोबर 2022 रोजी निश्चित केली आहे. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये PerfectPack Limited कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्केचा अपर सर्किट लागला होता.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
PerfectPack Limited ही एक स्मॉल कॅप कंपनी असून चालू वर्ष 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यापूर्वी कंपनीच्या शेअरची किंमत 350 रुपये होती, त्यात जबरदस्त वाढ झाली असून सध्या शेअर 611.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सवर पैसे पावणाऱ्या लोकांनी 45 टक्क्यांचा नफा कमावला आहे. त्याचवेळी, मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की या कंपनीच्या शेअरची किंमत सहा महिन्यापूर्वी 182 रुपये होती, ज्यात वाढ होऊन शेअर सध्या 611.20 रुपयांवर गेला आहे. 6 महिन्यांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 180 टक्के नफा कमावला आहे. त्याचवेळी, मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 155 टक्क्यांची कमालीची वाढ दिसून आली आहे. मागील सलग 8 ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने चालू वर्ष 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशही वितरीत केला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 5 रुपये लाभांश वितरीत केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Hot Stocks Of PerfectPack Limited share has increased after the news announcement of Stock Split 06 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON