29 April 2025 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Hot Stock | तुमचा पैसा म्युच्युअल फंडात आणि म्युच्युअल फंडाने तुमच्याच पैशाने हा मल्टिबॅगर शेअर खरेदी केला, हा तो स्टॉक

Hot Stock

Hot Stock | क्वांट म्युच्युअल फंडाने कमोडिटी केमिकल्सचा व्यवसाय करणाऱ्या एका स्मॉल कॅप कंपनीमधे मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, “पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स”. क्वांट म्युच्युअल फंडाने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज/BSE निर्देशांकावर मोठ्या प्रमाणात बोली लावून पंजाब अल्कलीज आणि केमिकल्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर 79.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या केमिकल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 100.90 रुपये आहे. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने मागील अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे.

म्युच्युअल फंडाची मोठी गुंतवणुक :
क्वांट म्युचुअल फंड कंपनीने पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे 45.56 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE च्या बल्क डील डेटानुसार, Quant Mutual Fund ने Punjab Alkalies & Chemicals Ltd चे 4,556,962 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत, त्यामुळे शेअर्स उच्चांक किमतीवर पोहोचले आहेत. या म्युच्युअल फंडांनी कंपनीचा 1.9 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. क्वांट म्युच्युअल फंडाने सरासरी 79 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स खरेदी केले आहेत. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनी मुख्यतः कॉस्टिक सोडा लाय, हायड्रोक्लोरिक ऍसिड, लिक्विड क्लोरीन, सोडियम हायपोक्लोराइट आणि हायड्रोजन वायू निर्मिती करण्याचे काम करते. ही कंपनी उत्तर भारतातील कॉस्टिक सोडाचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

अडीच वर्षात दिला 1000 टक्के परतावा :
पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील अडीच वर्षात आपल्या शेअर धारकांना 1000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 6 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकवर 5.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. पंजाब अल्कलीज अँड केमिकल्स कंपनीचे शेअर 25 ऑक्टोबर 2022 रोजी 79.75 रुपये किमतीवर बंद झाले होते. जर तुम्ही 6 मार्च 2020 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 13.67 लाख रुपये झाले असते.

एका वर्षात दिला 155 टक्के परतावा :
पंजाब अल्कलीज आणि केमिकल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना फक्त एका वर्षात 155 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी 27 ऑक्टोबर 2021 रोजी या केमिकल कंपनीचे शेअर्स 31.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 79.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी 2022 या चालू वर्षात आपल्या भागधारकांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stock of Punjab Alkalies And Chemicals share price return on investment on 29 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या