15 January 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडत आहेत हे शेअर्स, अल्पावधीत 100 ते 252 टक्के परतावा मिळतोय

Hot Stocks

Hot Stocks | लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. अनेक मीडिया हाऊसेसनी एक्झीट पोल जारी करायला सुरुवात केली आहे. यामधे स्पष्टपणे भाजपला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे भाकीत वर्तवले जात आहेत. त्यामुळे आज शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली आहे.

दरम्यान या पूर्ण निवडणुकीच्या काळात असे काही शेअर्स होते, जे अफाट तेजीत वाढत होते. अवघ्या काही आठवड्यात या कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 252 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण या शेअर्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आज देखील या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.

हेल्दी लाइफ अॅग्रिटेक लिमिटेड :
ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या, त्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 4.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 19.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फक्त निवणुकीचा काळ विचारात घेतला तर या काळात हा स्टॉक 252 टक्के वाढला आहे.

सनसिटी सिंथेटिक्स :
ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या, त्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 7.58 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 26.18 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फक्त निवणुकीचा काळ विचारात घेतला तर या काळात हा स्टॉक 232 टक्के वाढला आहे.

फ्रँकलिन इंडस्ट्रीज :
मागील आठवड्यात या कंपनीने आपले राइट्स इश्यू गुंतवणुकीसाठी खुले केले होते. हा राईट इश्यू 24 मे ते 11 जून च्या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 13 मे हा दिवस निश्चित केला होता. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.43 टक्के घसरणीसह 0.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. राइट्स इश्यू लाँच केल्यावर हा स्टॉक तब्बल 160 टक्के वाढला आहे.

ज्योती इन्फ्राव्हेंचर्स लिमिटेड :
आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 24.01 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 19 एप्रिल पासून 1 जून पर्यंत या कंपनीचे शेअर्स 147 टक्के वाढले आहेत. मात्र मार्च 2024 तिमाहीत या कंपनीला 1.87 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मर्क्युरी ट्रेड लिंक्स लिमिटेड, रतनइडिया पॉवर लिमिटेड, कोठारी इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन लिमिटेड, आयस्ट्रीट नेटवर्क लिमिटेड आणि रोलटेनर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 146 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment 03 June 2024.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x