22 January 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Hot stocks | जबरदस्त तिमाही निकालानंतर फार्मा क्षेत्रात मजबूत तेजी, या शेअर्सवर लक्ष ठेवा, भरघोस परतावा मिळेल

Hot stock

Hot stocks | मागील तिमाहीत फार्मा सेक्टरची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. फार्मा कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना खुश करून टाकले आहे. अशा परिस्थितीत, काही फार्मा स्टॉक्सवर एक लक्ष ठेवा जे पुढील काळात जबरदस्त परतावा देण्यासाठी तयार आहेत.

निर्यात 8 टक्क्यांनी वाढली :
2022-2023 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची फार्मा क्षेत्रातील निर्यात आठ टक्क्यांनी वाढली असून 6.26 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. स्टॉक मार्केट आणि अर्थ तज्ञ यांच्या मते, 2022-2023 मध्ये भारतातून औषधे इत्यादींच्या निर्यातीत 10 टक्क्यांची जबरदस्त वाढ अपेक्षित आहे. बाजारातील तज्ञ आणि फार्मा क्षेत्रातील अनुभवी गुंतवणूकदारांच्या मते, “पहिल्या तिमाहीत फार्मा क्षेत्रातील निर्यातीत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेतील निर्यात 3.6 टक्क्यांनी वाढली आहे. फार्मा निर्यातीत अमेरिकेचा वाटा सुमारे 30 टक्के आहे.” फार्मा क्षेत्राची चांगली कामगिरी म्हणजे कंपन्याही चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत, काही फार्मा स्टॉक्सची आपण माहिती घेऊ जे पुढील काळात जबरदस्त परतावा देण्यासाठी तयार आहेत.

जगसनपाल फार्मास्युटिकल्स :
यावर्षी या फार्मा कंपनीने बीएसईमधील आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. 2022 मध्ये कंपनीचा शेअर 179.10 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 345.40 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना सुमारे 93 टक्के परतावा मिळाला आहे. ही भारतातील एक आघाडीची फार्मा कंपनी आहे.

लॅक्टोज इंडिया लिमिटेड :
या कंपनीच्या शेअर्सनीही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर 39 रुपयेवर ट्रेड करत होता.आता ह्या शेअर्सच्या किमतीत वाढ होऊन तो 75.65 रुपयेवर गेला आहे. या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 93.97 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील तिमाहीच्या निकालात कंपनीने चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे.

सिस्केम इंडिया :
सिस्केम इंडियाच्या शेअर्सनी 2022 मध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. कंपनीच्या स्टॉकनी बीएसईवर यावर्षी 67.38 टक्के वाढ नोंदवली आहे. या दरम्यान, कंपनीच्या शेअरची किंमत 17.30 रुपयांवर ट्रेड करत होती ती आता वाढून 67.63 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

पुढील तिमाहीत फार्मा क्षेत्राची कामगिरी :
अर्थ तज्ञ आणि बाजारातील विश्लेषक म्हणतात की, “आम्हाला विश्वास आहे की, रशिया-युक्रेन युद्ध संपल्यानंतर, आमची EU आणि CIS देशांना होणारी निर्यात जास्त प्रमाणात वाढेल. आणि चालू आर्थिक वर्षात, आमची फार्मा निर्यात सुमारे 27 अब्ज डॉलर असेल. मागील आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, भारताची फार्मा निर्यात 24.61 अब्ज डॉलर पेक्षा थोडी जास्त होती, जी मागील आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत एक टक्के जास्त आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot stocks from Pharma sector has given huge return to investors on 1 August 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(298)pharma stock(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x