22 February 2025 2:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Hot Stocks | झुनझुनवालांच्या कंपनीने या कंपनीचे 40 लाखांहून अधिक शेअर्स खरेदी केले, 5 दिवसात 45 टक्के नफा, तुम्हीही विचार करा

Hot Stocks

Hot Stocks | आज आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत त्या कंपनीचे 40 लाख शेअर्स राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीने विकत घेतले आहेत. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत ती आहे सिंगर इंडिया कंपनी. सिंगर इंडियाचे शेअर मागील 5 दिवसात तब्बल 45 टक्के पेक्षा जास्त वधारले आहेत. मागील दोन दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 35 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक कंपनीने सिंगर इंडियामध्ये खूप मोठा हिस्सा खरेदी करून गुंतवणूक केली आहे.

सिंगर इंडिया कंपनी :
शिलाई मशीन आणि घरगुती वस्तू आणि स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणाऱ्या सिंगर इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. सिंगर इंडियाचे शेअर्स मागील 5 दिवसात 45 टक्के वधारले आहेत. त्याच वेळी, मागील फक्त दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 35 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आणि गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा झाला आहे. वास्तविक, राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक कंपनीने सिंगर इंडियाचे 40 लाख शेअर्स खरेदी करून खूप मोठी गुंतवणूक केल्याची बातमी समोर येताच या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी झालेली पाहायला मिळत आहे. बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सिंगर इंडियाच्या शेअर्समध्ये 18.15 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आणि या वाढीसह शेअर्स ची किंमत 81.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक कंपनी RARE Investments ने सिंगर इंडिया कंपनीत एक मोठा हिस्सा विकत घेऊन गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवालाच्या गुंतवणूक फर्मने सिंगर इंडियाचे 42,50,000 शेअर्स खरेदी केले, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 10 टक्के पेक्षा जास्त आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक कंपनीने 53.50 रुपये प्रति शेअर दराने 42.50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी दीर्घ आजारपणाने निधन झाले.

सिंगर इंडियाच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 85 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स 18 जुलै 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 43.55 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. 17 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 81.70 रुपये च्या किमतीवर वर व्यवहार करत आहेत. जर आपण मागील 6 महिन्यांबद्दल माहिती घेतली तर सिंगर इंडियाचे शेअर्स 40 टक्के पेक्षा वर गेले आहेत. दुसरीकडे, सिंगर इंडियाच्या शेअर्समध्ये या एका वर्षात आतापर्यंत तब्बल 31 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks investment of Rakesh Jhunjhunwala in Singer India share price return on 18 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)#Rakesh Jhunjhunwala(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x