19 November 2024 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Hot Stocks | गुंतवणूकदारांना 625 टक्के परतावा देणाऱ्या शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, ब्रोकर्सकडून टार्गेट प्राईस, स्टॉक नेम नोट करा

Hot Stocks

Hot Stocks | भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि दिग्गज उद्योजक राधाकिशन दमानी यांच्या मालकीची रिटेल चेन कंपनी डीमार्टचे शेअर्स पुढील काळात 5100 रुपयेवर जाऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. राधाकिशन दमनी यांना भारतातील रिटेल किंग म्हणून ओळखले जाते. दमानी यांची कंपनी डीमार्टने स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 625 टक्के नफा कमवून दिला आहे.

ज्यावेळी डीमार्टचा IPO शेअर बाजारात आला होत, तेव्हा शेअर्स 299 रुपयांना वितरीत केले गेले होते. IPO ओपनिंगमध्ये डीमार्टचे शेअर्स 102 टक्केच्या प्रीमियमसह 604.40 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 3 ऑक्टोबर 2022 रोजी डीमार्ट कंपनीचे शेअर्स 4450 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म आणि गुंतवणूक तज्ञांनी डीमार्टच्या शेअर्सला बाय रेटिंग दिली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. डीमार्टची मूळ कंपनी Avenue Supermart आहे.

DMart ची वाटचाल :
आर्थिक वर्ष 2022 मध्ये डीमार्टचे शेअर्स दुसऱ्या तिमाहीत जवळपास 30 टक्के वाढले आहेत. 30 जून 2022 रोजी डीमार्टचे शेअर्स 3396.3 रुपयांवर ट्रेड करत होते. 3 ऑक्टोबर 2022रोजी डीमार्टचे शेअर्स 4450 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. राधाकिशन दमानी हे लोकप्रिय डीमार्ट रिटेल स्टोअरचे संस्थापक आहेत. राधाकिशन दमानी प्रसिद्ध अनुभवी गुंतवणूकदार आणि उद्योजक म्हणून भारतात नावाजले आहेत. दामनी आपल्या ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्स कंपनीमार्फत त्यांचा पोर्टफोलिओ व्यवस्थापित करतात. डीमार्ट शेअर्सची आतापर्यंतची सर्वकालीन उच्चांकी किंमत 5899.90 रुपये आहे.

ब्रोकरेज फर्मने दिली लक्ष किंमत :
प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांनी 30 सप्टेंबर 2022 च्या ताज्या अहवालात डीमार्टबद्दल भाष्य केले आहे. “आम्ही डीमार्ट संबधित आमचे EPS आकडेवारीचे अंदाज अपग्रेड करत आहोत. या कंपनीच्या शेअर्ससाठी पुढील काळातील DCF आधारित लक्ष्य किंमत 5120 रुपये राहील. आणि आमचा विश्वास आहे की डीमार्टच्या शेअर मध्ये आर्थिक वर्ष 2023 मध्ये लक्षणीय वाढ दिसून येईल. आम्हाला खात्री आहे की कंपनीने दैनंदिन वस्तूच्या किमती कमी केल्यामुळे सध्याच्या वाढत्या महागाईच्या परिस्थितीत विक्री वाढेल आणि मध्यमवर्गाला असंघटित रिटेल क्षेत्रामधून संघटित रिटेल ब्रँडकडे वळवता येईल”.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hot Stocks of Avenue Supermart brand DMart is ready to raise in short term on 04 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x