22 January 2025 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Hot Stocks | हे 7 बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, उच्च परतावा मिळेल, स्टॉकची यादी सेव्ह करा

Hot stocks

Hot Stocks| मागील काही आठवड्यापासून शेअर बाजार अस्थिर असला तरी बँकिंग सेक्टर आणि वित्तीय क्षेत्राची कामगिरी आश्चर्यचकित करणारी राहिली आहे. मे 2022 पासून RBI ने चार वेळा व्याजदर वावाढवले आहेत. RBI रेपो दरात वाढ करत आहे, त्याचा परिणाम म्हणून बँकानाही कर्जदरात वाढ करावी लागत आहे. या व्याजदराच्या तुलनेत एफडीवरील व्याजदरात खूप कमी वाढ झाली आहे. दुसरीकडे, बँकिंग क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण आणि NPA मध्ये कमालीची वाढ दिसून येत आहे. SME आणि किरकोळ क्षेत्रातील वाढ संथ आणि सावकाश दिसून येत आहे. सेवा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही थोडीफार सुधारणा दिसून आली आहे. सध्या परिस्थिती सुधारल्यामुळे, या क्षेत्रात सकारात्मक वाढ अपेक्षित आहे.

बँका कर्ज दरात वाढ :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की,RBI ने रेपो दरात वाढ केल्यामुळे कमर्शिअल बँकांनीही मागील काही महिन्यांत आपल्या कर्जदरात वाढ केली आहे. मात्र, या प्रमाणात ठेवींच्या आणि गुंतवणुकीच्या दरात खूप कमी वाढ दिसून आली आहे. तथापि, मुदत ठेवीचा दर आणखी वाढवला जाऊ शकतो, ज्यामुळे निधी खर्च वाढेल. उच्च LCR आणि CASA यांच्यातील संयोगामुळे मुदत ठेवींच्या दरात वाढ केली जाऊ शकते. सध्या, ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की बँकिंग क्षेत्राचा NIM आर्थिक वर्ष 2023 मध्ये चांगला सुधारेल आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये मार्जिनचे पुन्हा पुनरावलोक केले जाईल.

कर्जाची अपेक्षित वसुली :
ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की भारतीय बँकिंग प्रणाली कर्जाची चांगली वसुली करत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात पुनरागमन होत असताना, रिटेल आणि SME विभागांमध्ये कर्जाची मागणी अधिक दिसून आली आहे. गुंतवणूक आणि ठेवींची वाढ चांगली झाली आहे. तथापि, व्याजदर वाढल्याने आणि बँकांच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. मालमत्तेचे मिश्रण सुधारल्याने कर्ज उत्पन्नात अपेक्षीत सुधारणा होण्याची चिन्हं मिळत आहेत. RBI ने Tax-Hard हे आर्थिक धोरण सुरू ठेवणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करता येईल.

टॉप बँकिंग स्टॉक :
* SBI : CMP 531 रुपये/ लक्ष्य किंमत : 625 रुपये
* ICICI बँक : CMP 863 रूपये/ लक्ष्य किंमत : 1050 रुपये
* फेडरल बँक : CMP 119 रुपये/लक्ष्य किंमत : 130 रुपये
* IndusInd बँक : CMP 1186 रुपये/ लक्ष्य किंमत : 1450 रुपये
* HDFC बँक : CMP 1422 रुपये/ लक्ष्य किंमत : 1800 रुपये
* ऍक्सिस बँक : CMP 734 रुपये/ लक्ष्य किंमत : 875 रुपये
* बँक ऑफ बडोदा : CMP 132 रुपये/लक्ष्य किंमत :150 रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot stocks to Buy call on 8 banking stocks check details on 4 October 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)#Stock Market Crash(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x