HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा

HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या व्यवहारात या कंपनीचे शेअर्स 15.28 टक्के वाढीसह 234.20 रुपये किमतीवर पोहचले होते. ( हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
ICRA फर्मने 24 एप्रिल 2024 रोजी हुडको स्टॉकवर स्थिर दृष्टीकोन व्यक्त केला आहे. भारत सरकारने हुडको कंपनीला नवरत्न दर्जा दिल्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी हुडको स्टॉक 11.97 टक्के वाढीसह 227.35 रुपये किमतीवर ट्रेड क्लोज झाला होता. मागील 1 वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 369 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 6 महिन्यात 203 टक्के परतावा दिला आहे.
भारत सरकारने हुडको कंपनीला गृहनिर्माण आणि शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे. हुडको कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये तुलनेने कमी क्रेडिट जोखीम असल्याने गुंतवणूकीची जोखीम कमी होते. भारत सरकार शहरी पायाभूत सुविधामध्ये सुधार करण्यासाठी अनेक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे.
ICRA ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, हुडको कंपनीची भांडवलीकरण पातळी, वैविध्यपूर्ण कर्ज प्रोफाइल आणि चांगली आर्थिक लवचिकता यामुळे कंपनीच्या रेटिंगमध्ये सकारात्मक सुधारणा पाहायला मिळत आहे. कंपनीची सार्वभौम मालकी, कंपनीच्या तरलता प्रोफाइलला मजबूत समर्थन देते, त्यामुळे तुलनेने व्यवसायातील कमी जोखममुळे कंपनीच्या कामगिरीमध्ये सुधारणा पाहायला मिळत.
ICRA ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, हुडको कंपनीच्या कर्ज पोर्टफोलिओमध्ये कर्जाची जोखीम सरकारी हमींच्या उपस्थितीमुळे कमी होत आहे. मात्र अनेक राज्य सरकारांची कमकुवत आर्थिक स्थिती हा हुडको कंपनीच्या पोर्टफोलिओसाठी चिंतेची बाब आहे. 31 डिसेंबर 2023 च्या तिमाहीत हुडको कंपनीचे सकल उत्पन्न आणि निव्वळ नफा सकारात्मक राहिले होते.
ICRA च्या मते, हुडको कंपनी पुढील काळात चांगली आर्थिक कामगिरी करू शकते. सुधारित नियामक व्याख्येनुसार गृहनिर्माण वित्त कंपनी म्हणून व्यवसाय चालू ठेवण्याच्या अटींची पूर्तता करण्यात हुडको कंपनीच्या अक्षमतेची दखल ICRA ने घेतली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HUDCO Share Price NSE Live 27 April 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB