17 April 2025 7:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

HUDCO Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 1 वर्षात दिला 400% परतावा

HUDCO Share Price

HUDCO Share Price | हुडको म्हणजेच हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह 283.95 रुपये किमतींवर क्लोज झाले होते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये हा स्टॉक 4 टक्केपर्यंत वाढून 294.80 रुपये किमतीवर पोहचला होता. ( हाउसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म इलारा कॅपिटलने हुडको स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने मे 2024 मध्ये स्टॉकवर कव्हरेज सुरू केले होते. हा स्टॉक पुढील काळात मजबूत वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी हुडको स्टॉक 1.28 टक्के घसरणीसह 280.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Elara Capital फर्मने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, निवडणूक निकालाच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक घसरणीतून सावरला. पुढील काळात हा स्टॉक सकारात्मक कामगिरी करू शकतो, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये कंपनीचा व्यवसाय CAGR 20 टक्क्यांनी वाढू शकतो.

हुडको कंपनीने आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 15,000 कोटी रुपये AUM साध्य करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हुडकोच्या जवळपास 40 टक्के दायित्वे आणि करपात्र बाँड्सची किंमत 50bps कमी झाली आहे. आणि परकीय चलन कर्ज 100bps कमी होऊन 7.33 टक्केवर आले आहे. पुढील काळात हुडको कंपनी 54EC बाँड जारी करण्याची शक्यता असल्याने कंपनीचे भांडवली खर्च आणखी कमी होईल, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

मागील दोन वर्षांत हुडको कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 770 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून 2022 मध्ये या कंपनीचे शेअर 33.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत हुडको स्टॉक 150 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.

2024 या वर्षात शेअरची किंमत आतापर्यंत 125 टक्क्यांनी वाढली आहे. एलारा कॅपिटल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, भारत सरकारचे लक्ष गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रावर आहे. पुढील काही दिवसांत सरकारतर्फे विविध विकास धोरणांबद्दल घोषणा केल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत हुडको स्टॉक वाढून 350 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HUDCO Share Price NSE Live 29 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hudco Share Price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या