5 November 2024 8:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, पुढची मजबूत टार्गेट प्राइस जाहीर

ICICI Bank Share Price

ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते.

तज्ञांच्या मते, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 1200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 3.01 टक्के वाढीसह 1,083.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.

नुकताच आयसीआयसीआय बँकेने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमधील आपले भाग भांडवल वाढवले आहे. 29 फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेने ICICI Lombard General Insurance कंपनीमध्ये 431 कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक करून 25.14 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. त्यापूर्वी आयसीआयसीआय बँकेने ICICI Lombard कंपनीचे 81 लाख शेअर्स 1,356 कोटी रुपये मूल्यावर खरेदी केले होते.

या गुंतवणुकीमुळे ICICI लोम्बार्ड ही कंपनी आता आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी बनली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ICICI बँकेचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 1089.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1,670 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वर्षात आतापर्यंत आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 8 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

अरिहंत कॅपिटल मार्केट्स फर्मच्या तज्ञांनी, ICICI बँकेच्या शेअर्सवर 1120-1180 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 1030 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. देवेन चोक्सी रिसर्च फर्मने आयसीआयसीआय बँकेच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या बँकिंग स्टॉकवर 1250 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सने ICICI बँकेच्या शेअर्सची रेटिंग ‘न्यूट्रल’ केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ICICI Bank Share Price NSE Live 02 March 2024.

हॅशटॅग्स

#ICICI Bank Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x