Ideaforge Share Price | मालामाल होण्याची संधी! हा शेअर 100 टक्क्याहून अधिक परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

Ideaforge Share Price | आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.3 टक्के वाढीसह 738 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी या कंपनीचा IPO 672 रुपये प्राइस बँडवर लाँच झाला होता. म्हणजे मंगळवारी या कंपनीचे शेअर आपल्या IPO किमतीपेक्षा 9 टक्के वाढीव किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात यशस्वी IPO पैकी एक होता.
जुलै 2023 मध्ये आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचा IPO लिस्टिंगच्या दिवशी 1,344 रुपये म्हणजेच IPO किंमतीच्या तुलनेत 100 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता. मात्र त्यांनतर शेअरमध्ये प्रचंड विक्रीचा दबाव वाढला. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी स्टॉक 1.50 टक्के घसरणीसह 730.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीच्या शेअर्सने 689 रुपये ही विक्रमी नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. ही किंमत शेअर्सच्या लिस्टिंग किंमतीपेक्षा 49 टक्के कमी आहे. यावर्षी जानेवारी 2024 मध्ये आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांनी घसरले होते. त्यानंतर स्टॉक फेब्रुवारी महिन्यात 4 टक्क्यांनी वाढला आहे.
जुलै 2023 रोजी आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर सूचीबद्ध झाल्यानंतर प्रत्यके महिन्याला घसरत होते. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के, सप्टेंबर 2023 मध्ये 9 टक्के, ऑक्टोबर 2023 मध्ये 11 टक्के आणि नोव्हेंबर 2023 मध्ये 2 टक्क्यांनी कमजोर झाले होते. डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली होती.
ब्रोकरेज हाउस एशियन मार्केट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञानी आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 1,607 रुपये टार्गेट प्राईससाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. डिसेंबर तिमाहीत आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीने 14.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील तिमाहीतील 0.89 कोटी रुपयेच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1,562 टक्के वाढ झाली आहे.
मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीत आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीला 7.8 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर तिमाहीत आइडियाफोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचा EBITDA 26.19 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 13.87 कोटी रुपये होता. डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने 90.9 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसूल संकलनात 11 पट वाढ झाली आहे. कंपनीने मागील वर्षी याच तिमाही कालावधीत 7.8 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ideaforge Share Price NSE Live 21 February 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL