18 November 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

IdeaForge Share Price | एकाच दिवशी 100% परतावा देणारा आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी शेअर स्वस्त होणार? स्टॉकबाबत तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

IdeaForge-share Price

IdeaForge Share Price | आइडिया फोर्ज टेक्नोलॉजीज लिमिटेड कंपनीचा IPO जून 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 638 रुपये ते 672 रुपये दरम्यान निश्चित केली होती. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता आणि जुलै 2023 मध्ये हा स्टॉक BSE आणि NSE इंडेक्सवर प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध करण्यात आला.

मागील काही महिन्यांपासून आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी स्टॉक 0.92 टक्के घसरणीसह 909.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आज आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 909 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. सध्या हा स्टॉक आणखी विक्रीच्या दबावाला बळी पडू शकतो, असे संकेत मिळत आहेत. जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा हा स्टॉक 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

त्यावेळी आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 1,305 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ज्या गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले होते. मागील तीन महिन्यांत आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी स्टॉक विक्रीच्या दबावाला बळी पडला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणत विक्री केली आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी स्टॉकमध्ये आणखी घसरण होऊ शकते. आयडियाफोर्ज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना शेअर धारकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञाच्या मते आयडियाफोर्ज कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर अतिशय कमकुवत दिसत आहेत.

तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी विक्री होण्याची शक्यता आहे, आणि स्टॉक किंमत खाली येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स 850 रुपये ही खालची किमत स्पर्श करू शकतात. जर हा स्टॉक 850 रुपये प्रति शेअर किमतीवर टिकला तर स्टॉक 975 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IdeaForge Share Price today on 27 September 2023.

हॅशटॅग्स

ideaForge Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x