18 October 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

IFCI Share Price | शेअर प्राईस 76 रुपये, कमाईची मोठी संधी, 2 दिवसात दिला 22% परतावा

IFCI Share Price

IFCI Share Price | आयएफसीआय म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 69.62 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. ( इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

आयएफसीआय कंपनीमध्ये भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18,195 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 72 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 12.28 रुपये होती. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आयएफसीआय स्टॉक 10.03 टक्के वाढीसह 76.55 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मार्च 2023 तिमाहीत आयएफसीआय कंपनीने 413.65 कोटी रुपये निव्वळ विक्री केली होती. या तुलनेत मार्च 2024 तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 46.4 टक्क्यांच्या वाढीसह 605.42 कोटी रुपये नोंदवली आहे. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीला 241.18 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 157.32 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 165.2 टक्के वाढ झाली आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास कंपनीची निव्वळ विक्री 2023-24 मध्ये 17.2 टक्क्यांनी वाढून 1,986.58 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. 2022-23 मध्ये कंपनीची निव्वळ विक्री 1694.64 कोटी रुपये होती. सलग 5 आर्थिक वर्षापासून आयएफसीआय ही कंपनी तोट्यात होती. मात्र मार्च 2023-24 मध्ये कंपनीने 241.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 2022-23 मध्ये आयएफसीआय कंपनीला 119.78 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

मागील एका महिन्यात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 124 टक्के वाढली आहे. 2024 या वर्षात आयएफसीआय स्टॉक 140 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 443 टक्के वाढली आहे. मागील 4 वर्षात आयएफसीआय कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 851 टक्के नफा कमावून दिला आहे.

IFCI लिमिटेड ही कंपनी पूर्वी इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाने ओळखली जात होती. आयएफसीआय ही सरकारी नॉन-बैंकिंग वित्तीय संस्था भारतातील औद्योगिक प्रकल्पांसाठी दीर्घकालीन आर्थिक सहाय्य देण्याचे काम करते. या कंपनीची स्थापना 1948 साली करण्यात आली होती. आयएफसीआय कंपनी आता विमानतळ, रस्ते, दूरसंचार, ऊर्जा, रिअल इस्टेट, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांसह अनेक उद्योगांना आर्थिक मदत देण्याचे काम करते.

एप्रिल 2024 पर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळने आयएफसीआय कंपनीचे 1.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये भारत सरकारने देखील 71.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. FII कडे आयएफसीआय कंपनीचे 2.31 टक्के भाग भांडवल आहेत. तर DII कडे कंपनीचे 1.94 टक्के भाग भांडवल आहेत. आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 20.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x