18 April 2025 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Income Tax Deduction | होय! तुमचा पगार 10.50 लाख रुपये असेल तरीही 100% टॅक्स वाचवू शकता, नोट करा डिटेल्स

Income Tax Deduction

Income Tax Deduction | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. तुम्हीही कर भरलात तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावरही 100 टक्के टॅक्स वाचवू शकता. होय, या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. चला तर सांगूयात तुम्ही कशा प्रकारे टॅक्स वाचवू शकता.

अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
सध्या तुमचे अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, पण एवढे सगळे झाल्यानंतरही तुम्हाला १०.५ लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर एकही कर भरावा लागणार नाही.

५० हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन
कोणत्याही व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १० लाख ५० हजार रुपये असेल तर तुम्हाला थेट ५० हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळते. अशावेळी तुमचं करपात्र उत्पन्न 10 लाख रुपये होतं. मीडिया रिपोर्टनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार रुपयांवरून 70 हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते.

80C वर दीड लाख रुपयांची सूट
या सर्वांव्यतिरिक्त तुम्ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या करसवलतीचा लाभ घेऊ शकता. यात एलआयसी, पीपीएफसह अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न केवळ ८,५०,० रुपये आहे.

येथे मिळेल ५० हजारांची सूट
याशिवाय आयकर कायदा 1961 च्या कलम 80सीसीडी अंतर्गत एनपीएसच्या माध्यमातूनही तुम्ही टॅक्स वाचवू शकता. यामध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे, म्हणजेच तुमचे करपात्र उत्पन्न आता फक्त 8 लाख रुपये होणार आहे.

येथे मिळेल 2 लाखांची सूट
तुम्ही कोणतंही घर खरेदी केलं असेल किंवा तुमच्या नावावर कोणतंही गृहकर्ज असेल तर तुम्हालाही आयकर सवलतीचा लाभ मिळतो. आयकर कायदा 24 बी अंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतची पूर्ण सूट मिळते. यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 6 लाख रुपये असेल.

इन्शुरन्स मार्फत ७५ हजार रुपयांची सूट मिळू शकते
याशिवाय तुम्ही आयकर कलम 80 डी अंतर्गत 75,000 रुपयांचा दावा करू शकता. तसंच तुमच्या कुटुंबासाठी विमाही मिळू शकतो. असे केल्याने तुमचे करपात्र उत्पन्न केवळ ५ लाख २५ हजार रुपये होईल.

येथे २५ हजार रुपयांची सूट मिळेल
या सर्वांव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही संस्थेशी संबंधित असाल तर देणगीच्या माध्यमातून २५ हजार रुपयांपर्यंतची करसवलतही मिळू शकते. यामध्ये तुम्ही कलम 80 जी ऑफ टॅक्स अंतर्गत क्लेम करू शकता. या सवलतीचा फायदा घेतल्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 5 लाख रुपये आहे, ज्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Income Tax Deduction if yearly salary is 1050000 rupees zero tax possible check details on 11 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Income Tax Deduction(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या