18 November 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Income Tax Refund | पगारदारांनो! 31 लाख लोकांचा इन्कम टॅक्स परतावा अडकला, वेळेपूर्वी ITR भरूनही तुमचा सुद्धा त्यात नंबर आहे?

Income Tax Refund

Income Tax Refund | यंदा प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापैकी मोठ्या संख्येने करदात्यांचा कर परतावा परत करण्यात आला आहे, परंतु प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, सुमारे 31 लाख लोकांचा कर परतावा अडकण्याची शक्यता आहे. या लोकांनी कर निर्धारण वर्ष 2023-24 साठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरणपत्र मुदतीपूर्वी भरले होते, परंतु अद्याप त्यांच्या आयटीआरची पडताळणी केलेली नाही.

व्हेरिफिकेशनला 30 दिवसांची मुदत

आयकर विभाग आयटीआरच्या पडताळणीसाठी (व्हेरिफिकेशन) विवरणपत्र भरण्यापासून ३० दिवसांची मुदत देतो. या कालावधीत विवरणपत्रांची पडताळणी करणे बंधनकारक आहे. ही मुदत संपल्यानंतर करदात्यांना भरलेल्या अतिरिक्त कराच्या परताव्यासाठी पात्र मानले जात नाही.

एवढेच नव्हे तर करदात्यांनी विहित मुदतीत आपल्या विवरणपत्रांची पडताळणी केली नाही तर आयटीआर नाकारला जाईल म्हणजेच तो भरलेला मानला जाणार नाही. पडताळणी न केल्यास प्राप्तिकर विभाग कर परताव्यासाठी आयटीआरवर प्रक्रिया करणार नाही. अशा परिस्थितीत या करदात्यांना पुन्हा कर विवरणपत्र भरावे लागणार आहे.

6.91 कोटींहून अधिक लोकांनी भरले टॅक्स विवरणपत्र

प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, 23 ऑगस्टपर्यंत 6.91 कोटींहून अधिक लोकांनी कर विवरणपत्र भरले होते, परंतु केवळ 6.59 कोटी करदात्यांनी त्यांच्या आयटीआरची पडताळणी केली होती. उर्वरित ३१ लाख लोकांनी विवरणपत्रांची पडताळणी केलेली नाही. यातील काही करदात्यांसाठी पडताळणीची निर्धारित ३० दिवसांची मुदत लवकरच संपुष्टात येत आहे. आयकर विभाग अशा लोकांना ई-मेल, एसएमएस आणि इतर माध्यमातून अलर्ट पाठवत आहे.

तरीही तुम्ही आयटीआर भरू शकता

एक्स प्लॅटफॉर्मवर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या ट्विटमध्ये आयकर विभागाने म्हटले आहे की, पडताळणीची अंतिम तारीख संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा रिटर्न भरावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला लेट फी भरावी लागेल. अशा वेळी दंडासह विलंबाने आयटीआर भरावा लागणार आहे. पाच लाखरुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना एक हजार रुपये विलंब शुल्क आणि पाच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना पाच हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

आयटीआर’ची पडताळणी कशी करावी :

तुम्ही तुमचा आयटीआर सहज पडताळून पाहू शकता. ई-फायलिंग पोर्टलवरील आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून आपण आयटीआर ची पडताळणी करू शकता. याशिवाय नेट बँकिंग आणि ऑफलाइन माध्यमातूनही आयटीआरची पडताळणी करता येते. आधार ओटीपीद्वारे पडताळणीसाठी तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. यानंतर तुम्हाला ‘ई-व्हेरिफाय रिटर्न’वर जावे लागेल. आता ज्या माध्यमाद्वारे तुम्हाला पडताळणी करायची आहे ते निवडा आणि पडताळणीचे काम पूर्ण करा.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Income Tax Refund status check details on 26 August 2023.

हॅशटॅग्स

#Income Tax Refund(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x