5 November 2024 9:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Income Tax Return | तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल? | अधिक जाणून घ्या

Income Tax Return

Income Tax Return | करनिर्धारण वर्ष २०२२-२३ साठी आयकरदाते आता ई-फायलिंग पोर्टलवर आयकर विवरणपत्र भरू शकतात. ई-फायलिंग पोर्टलवर जेव्हा तुम्ही आयटीआर ऑनलाइन फाइल कराल, तेव्हा तुम्हाला तेथील दोन फॉर्मपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. आयटीआर फॉर्म-१ आणि आयटीआर फॉर्म-४ . आपल्याला या दोन प्रकारांपैकी एकाची निवड करावी लागेल. आयटीआर फॉर्म-१ ला सहज म्हणूनही ओळखले जाते. बहुतेक करदाते या फॉर्मचा वापर करून आपला कर भरतात. या फॉर्ममधील बरीचशी माहिती आधीच भरलेली असते, जी करदात्याला पडताळून पाहावी लागते. तसेच माहिती चुकीच्या पद्धतीने भरल्यास ती दुरुस्त करावी लागते.

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे :
ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म १६, बँक खात्याचा तपशील, गुंतवणुकीचा तपशील यासोबत पुरावे आणि इतर उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे. इतकंच नाही तर आयटीआर फाईल करण्यासाठी पॅन आणि आधारची लिंक असणंही गरजेचं आहे. करदात्याच्या ई-मेल आयडीची आयकर विभागाकडेही नोंदणी करावी.

आयटीआर-१ फॉर्म कोण भरणार :
पगार, मालमत्ता, व्याज आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न यासह ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे, अशांना हा फॉर्म भरावा लागतो. यामध्ये पगार, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्याजातून मिळणारे उत्पन्न, डिव्हिडंडपासून मिळणारे उत्पन्न याची माहिती जाहीर करावी लागते. या व्यतिरिक्त इतर कोठूनही तुमचे उत्पन्न आले तर तुम्ही या फॉर्मचा वापर आयकर विवरणपत्र भरण्यासाठी करू शकत नाही.

आयटीआर फॉर्म-४ कोण भरणार :
जर तुम्ही व्यक्ती, एचयूएफ आणि फर्म (एलएलपी व्यतिरिक्त) असाल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे उत्पन्न कलम ४४ एडी, ४४ एडीए किंवा ४४ एईच्या हिशोबाप्रमाणे व्यवसाय आणि व्यवसायातून आले असेल तर तुम्हाला आयटीआर फॉर्म-१ भरावा लागणार नाही. तुम्हाला आयटीआर फॉर्म-४ निवडून आयटीआर फाइल करावा लागेल.

आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख :
आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या व्यवसायासाठी ऑडिट आवश्यक आहे, अशा व्यक्ती ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. जर करदात्याने विशेष विदेशी किंवा देशांतर्गत व्यवहार केला असेल तर तो 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत काम पूर्ण करू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Income Tax Return filing documents required check details 29 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x