18 April 2025 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Predator Drones Deal | राफेल डील नंतर प्रेडिएटर ड्रोन डील होणार | अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेण्याची योजना

Predator Drones Deal

वॉशिंग्टन, २३ सप्टेंबर | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकाचा दौरा करत आहेत. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या संरक्षण डील होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून भारत 30 प्रीडेटर ड्रोन ( 30 Predator drones) खरेदी करणार असल्याने पंतप्रधान मोदी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या CEOसोबत बैठक करणार आहेत.

Predator Drones Deal, राफेल डील नंतर प्रेडिएटर ड्रोन डील होणार, अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेण्याची योजना – India to buy 30 Predator armored drones from US Narendra Modi meets CEOs of drone maker General Atomics :

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, Apple कंपनीचे सीईओ टिम कूक हेही या बैठकीत भाग घेणार होते, मात्र आरोग्य विषयक कारणांमुळे ते याबैठकीला हजर राहू शकणार नाही. दरम्यान, ज्या सीईओंसोबत मोदींची बैठक होणार आहे, त्यांनी भारतात गुंतवणूक केली तर, भारत अनेक बाबतीत प्रगती करु शकतो. यातील काही कंपन्या सोलार उर्जा निर्मिती करणाऱ्या आहेत, काही संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या तर काही रोजगार निर्मिती करणाऱ्या आहे.

प्रेडिएटर ड्रोन हा जगातील सर्वात अत्याधुनिक सैन्य ड्रोन:
भारतीय सैन्यात या ड्रोनच्या येण्यानं, आपली ताकद कमालीची वाढणार आहे. हे सगळे मानवरहित ड्रोन असल्याने, सैनिकांच्या जीवितहानीची शक्यता नसते. हा ड्रोन हार्ड प्वाईंटसोबत येतो, ज्यात हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल्स लावता येतात.

शिवाय सेंसर आणि लेजर गायडेड बॉम्बचाही या ड्रोनद्वारे शत्रूवर हल्ला करता येतो. यूएवी 50,000 फूटांवरूनही संचालित केला जाऊ शकतो आणि हा ड्रोन शत्रूच्या नजरेत न येता तब्बल 27 तास हवेत राहू शकतो. या ड्रोनद्वारे हेरगिरी करता येते, विमानांवर लक्ष्य ठेवता येतं आणि प्रसंगी हल्लाही करता येतो.

अमेरिकेसोबत संरक्षण करार:
अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानचे भ्याड हल्ले आणि चीनच्या कुरघोड्या पाहता आता भारत आपली सैनिकी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच भारताने आता तब्बल 30 सशस्र ड्रोन (Drone) खरेदीची योजना तयार केली आहे. यासाठी 3 अब्ज डॉलर म्हणजेच तब्बल 22 हजार कोटी रुपये लागणार आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत तिन्ही सैन्यदलांसाठी 10-10 एमक्यू-9 रिपर ड्रोन विकत घेण्याची योजना तयार करत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: India to buy 30 Predator armored drones from US Narendra Modi meets CEOs of drone maker General Atomics.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PredatorDronesDeal(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या