28 April 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक मालामाल करणार, दिग्गज ब्रोकिंग फर्मने दिले संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मालामाल करणार; या अपडेटनंतर तेजीचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
x

IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा

IndiaFirst Life Insurance IPO

IndiaFirst Life Insurance IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून परतवा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी लवकरच आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीला सेबीकडून आयपीओद्वारे भांडवल उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही कंपनी ‘बँक ऑफ बडोदा’ समर्थित कंपनी आहे. या कंपनीने मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये SEBI कडे IPO साठी ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स म्हणजेच DRHP सादर केला होता. (IndiaFirst Life Insurance Limited)

ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस/DRHP नुसार ‘इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीच्या IPO मध्ये 500 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू केले जाणार आहे. आणि कंपनीचे प्रवर्तक व इतर शेअर धारक ऑफर फॉर सेल अंतर्गत 141,299,422 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. ‘बँक ऑफ बडोदा’ ची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असलेली ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ ही खाजगी जीवन विमा कंपनी आहे. ही मुंबई स्थित कंपनी नवीन व्यवसाय विमा धारक, आणि सेवानिवृत्ती योजनांच्या बाबतीत सर्वात वेगाने वाढणारी खाजगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक मानली जाते.

IPO तपशील :
‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीच्या IPO मध्ये ‘बँक ऑफ बडोदा’ 89015734 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. त्याच वेळी ‘कार्मेल पॉइंट इन्व्हेस्टमेंट’ फर्म या IPO इश्यूमध्ये 39,227,273 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ देखील या कंपनीचे 13,056,415 शेअर्स ऑफलोड करणार आहे. ‘बँक ऑफ बडोदा’ ही भारतातील तिसरी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीमध्ये 65 टक्के भाग भांडवल धारण करत आहे. दरम्यान ‘Carmel Point Investments India’, ‘Warburg Pincus’ यांनी संयुक्तरित्या ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीचे 26 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ ने ‘इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स’ कंपनीचे 9 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IndiaFirst Life Insurance IPO is ready to launch soon check details on 22 March 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaFirst Life Insurance IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या