16 November 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN
x

Indian Hotels Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर, लवकरच 25% वाढणार, तज्ञांनी दिला स्टॉक खरेदीच सल्ला

Indian hotel share price

Indian Hotels Share Price | अर्थसंकल्पापूर्वी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह 320 रुपयांवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 2.74 टक्के वाढीसह 317.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील सध्याच्या मते पुढील काळात इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. म्हणून ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफरीजने इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 380 रुपये निश्चित केली आहे. तर ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 310 रुपयांवरून वाढवून 330 रुपये केली आहे. शेअर बाजारातील 14 तज्ञांपैकी 6 ने शेअर तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 4 तज्ञांनी शेअर पडत्या किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. 29 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर 117.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 2 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच जर तुम्ही जानेवारी 2021 रोजी इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.55 लाख रुपये झाले असते.

जर तुम्ही इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 148 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात स्टॉकची किंमत 43 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे. पुढील काळात या टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात, म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Company Share price 500850 INDHOTEL stock market live on 02 February 2023.

हॅशटॅग्स

Indian hotel share price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x