18 November 2024 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
x

Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ञ म्हणाले खरेदी करा, टार्गेट प्राईस पाहा

Tata Group Share Price

Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात व्यवहार करत आहेत. यापैकी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ ही देखील आहे. 1899 साली जमशेटजी टाटा यांनी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनीची स्थापना केली होती. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून मुख्य हॉटेल ‘ताजमहाल पॅलेस’ मुंबईत आहे. ही कंपनी ताज, विवांता, सिलेक्शन, द गेटवे, जिंजर यांसारख्या ब्रँड अंतर्गत जगातील 4 विविध खंडांमध्ये 107 ठिकाणी 250 हून अधिक हॉटेल्स आणि 10 देशांमध्ये 21,000 हून अधिक रूम्स चालवत आहेत. नुकताच कंपनीने आपल्या तिमाही निकाल जाहीर केले, आणि त्यावरून तज्ञांनी स्टॉक पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)

कंपनीचे तिमाही निकाल :
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ ने 403.56 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा नगा 95.96 कोटी रुपये होता, जो चार पट वाढला आहे. 2022 च्या डिसेंबर तिमाहीत इंडियन हॉटेल्सने 1,685.8 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 1,111.22 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष FY23 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 1,248.62 कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वी 1,014.23 कोटी रुपये होता.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 318.35 रुपयांवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.04 टक्के घसरणीसह 314.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 390 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. जर स्टॉक 390 रुपयांपर्यंत वाढला तर अल्पावधीत गुंतवणुकदारांना 22.5 टक्के परतावा मिळू शकतो.

गुंतवणुकीवर परतावा :
‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसांत 7.84 टक्क्यांनी वधारली आहे. तर मागील एक महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.19 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 0.36 टक्क्यांनी वर गेली आहे. तर मागील एका वर्षभरात या शेअरमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांनी 47.08 टक्के परतावा कमावला आहे. मागील 5 वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 132.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.

14 जुलै 1995 रोजी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत शेअरची किंमत 617.17 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 349 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 180.75 रुपये होती. सध्या ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनीचे मार्केट कॅप 45,218.44 कोटी रुपये आहे.

‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनीची नोंदणी 1902 साली मुंबई येथे करण्यात आली होती. कंपनीचे पहिले हॉटेल 1902 साली कुलाबा मुंबई येथे सुरू करण्यात आले होते. ‘ताजमहाल पॅलेस हॉटेल’ 1903 साली सुरू करण्यात आले होते. त्याकाळात सुरू करण्यात आलेले आधुनिक लिफ्ट आणि रशियन कार्पेट्स असलेले भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणून ‘ताजमहाल पॅलेस हॉटेल’ प्रसिद्ध झाले होते. 1980 मध्ये ताज ग्रुपने आपले पहिले आंतरराष्ट्रीय हॉटेल येमेनमधील ‘साना’ या ठिकाणी सुरू केले होते. झांबियामध्ये लुसाका येथे ‘ताज शेबा हॉटेल’ आणि ‘ताज पामोदझी’ हे हॉटेल सुरू करण्यात आले. IHCL कंपनीने कोलंबोमध्ये ‘ताज एक्झोटिका बेंटोटा’ आणि ‘ताज समुद्र’ हे दोन हॉटेल सुरू करून श्रीलंकेत आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price 500850 INDHOTEL stock market live on 06 February 2023.

हॅशटॅग्स

Tata Group Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x