22 January 2025 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा खात्रीलायक शेअर, स्टॉकमध्ये तुफानी तेजी येतेय, टार्गेट प्राईस जाणून घ्या

Indian Hotels Share Price

Indian Hotels Share Price | शेअर बाजारत टाटा समुहाच्या शेअरवर गुंतवणूकदारांचा जबरदस्त विश्वास आहे कारण, टाटा समुहातील शेअर आपल्या शेअरधारकांना कधीही निराश करत नाही. म्हणुन बऱ्याच वेळा शेअरबाजातील तज्ञ देखील टाटा समुहातील शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत असतात. सध्या शेअर बाजारातील तज्ञांचे लक्ष टाटा समुहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ या कंपनीच्या शेअरवर आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर्स ०.५० टक्के वाढीसह ३१६.५० रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या कंपनीत खूप मोठी बाजी लावली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)

स्टॉक बाबत तज्ञांचे मत:
मागील सहा महिन्यात ‘इंडियन हॉटेल्स’ या कंपनीचे शेअर १५.५ टक्के पेक्षा अधिक वाढले आहेत. वार्षिक आधारवर हा मिडकॅप स्टॉक ५२ टक्के वधारला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक १.१६ टक्के घसरणीसह ३१८.१५ रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कपनीचे एकुण बाजार भांडवल ४५,१९० कोटी रुपये आहे. चालु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ३८३ कोटी रुपये सर्वकालीन उच्च निव्वळ नफा कमावला आहे. कपनीने मागील पुर्ण वर्षात जेवढा नफा कमावला नव्हता, तेवढा नफा कंपनीने फक्त एका तिमाहीत कमावला आहे. ब्रोकरेज फर्म जिओजितने ‘इंडियन हॉटेल’ कंपनीच्या शेअरमध्ये पुढील काळात १२ टक्के आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. जिओजित फर्मच्या अहवालानुसार इंडियन हॉटेल्स कंपनीने चालु आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सरासरी रुम रेट, सुधारित ऑक्युपन्सी रेट आणि उच्च महसुल प्रति उपलब्ध रुममध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.

रेखा झुनझुनवाला पोर्टफोलिओ :
रेखा झुनझुनवाला यांनी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी रेखा झुनझुनवाला यांनी एकुण ३००१६९६५ शेअर्स धारण केले आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे कंपनीचे एकुण २.११ टक्के भाग भांडवल आहेत. १७ फेब्रुवारीपर्यत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘इडियन हॉटेल्स’ कंपनीमधील गुंतवणुकीचे मुल्य ९५५ कोटी रुपये आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओमधील टॉप १० मौल्यावान शेअरमध्ये ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअर्सचा समावेश होतो. ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनी ही भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी मानली जाते. कंपनीकडे ताज, जिंजर आणि विवांता यासारख्या ब्रँडचा समावेश होतो. या ब्रँड्सचा कंपनीत एकुण ३८.२० टक्के वाटा आहे. सध्या कंपनीच्या पोटॅफोलिओमध्ये एकुण २५० पेक्षा जास्त हॉटेल्स सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price 500850 INDHOTEL stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

#Indian Hotels Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x