22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा हा शेअर मालामाल करणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट

Indian Hotels Share Price

Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत हॉटेल सुरू करण्याची घोषणा केली आहे. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिनी इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत नवीन हॉटेल्स सुरू करण्याची घोषणा केली आहे.

टाटा समूहाची ही हॉटेल्स कंपनी 1.3 एकर जागेवर 150 खोल्यांचे हॉटेल बांधणार आहे. त्यामुळे इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी इंडियन हॉटेल स्टॉक 0.81 टक्के वाढीसह 475.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडियन हॉटेल कंपनीने म्हंटले की, “रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाने आध्याध्य शहर हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावाजले आहे. हे शहर आता जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी इंडियन हॉटेल कंपनीने अयोध्येत 400 खोल्यांचे तीन वेगवेगळे हॉटेल्स सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. या हॉटेलसाठी इंडियन हॉटेल कंपनी केएम बिझनेसशी सहयोग करणार आहे. यासह, आयएचसीएल कंपनीचे सिलेक्शन विवांता आणि जिंजर ब्रँड्स हे हॉटेल्स अयोध्येत सुरू राहतील.

इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 483 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 24 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 62.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअर्सची किंमत 261.80 टक्के मजबूत झाली आहे.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. इंडियन हॉटेल कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 37 टक्के वाढीसह 167 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या काळात कंपनीने 18 टक्के वाढीसह 1,481 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

इंडियन हॉटेल कंपनीचा EBITDA 26 टक्के वाढून 402 कोटी रुपयेवर गेला आहे. तर कंपनीचा EBITDA मार्जिन 180 बेसिस पॉइंट्सने वाढून 27.2 टक्के नोंदवला गेला आहे. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सप्टेंबर 2023 तिमाहीच्या अखेरीस इंडियन हॉटेल कंपनीचे 3 कोटी शेअर्स होते. म्हणजेच त्यांनी कंपनीचे जवळपास 2.11 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Hotels Share Price NSE Live 24 January 2024.

हॅशटॅग्स

#Indian Hotels Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x