22 November 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Indian Hotels Share Price | इंडियन हॉटेल्स शेअरने कमी कालावधीत 69 टक्के परतावा दिला, आता तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली

Highlights:

  • Indian Hotels Share Price
  • इंडियन हॉटेल्स शेअरची 52 आठवड्यांची किंमत
  • मागील एका वर्षात शेअरने 69 टक्के परतावा
  • इंडियन हॉटेल्स शेअरची टार्गेट प्राईस
  • कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल
Indian Hotels Share Price

Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मगळवरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या जवळ ट्रेड करत होते. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स काल 393.80 रुपयांपर्यंत वाढले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,083 कोटी रुपये आहे.

इंडियन हॉटेल्स शेअरची 52 आठवड्यांची किंमत

टाटा समूहाचा हा मल्टीबॅगर स्टॉक 2 जून 2023 रोजी 399.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 20 जून 2022 रोजी हा स्टॉक 207.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. 2023 मध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीच्या स्टॉकने लोकांना 21.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात शेअरने 69 टक्के परतावा

मागील एका वर्षात इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 69 टक्के वाढले आहेत. तर मागील तीन वर्षांत हा स्टॉक 324 टक्के मजबूत झाला आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 395.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इंडियन हॉटेल्स शेअरची टार्गेट प्राईस

Tips2trades फर्म तज्ञ म्हणाले की, इंडियन हॉटेल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या पातळीवर प्रॉफिट बुक करायला पाहिजे. या स्टॉकने नुकताच 350 रुपये किमतीवर नवीन ब्रेकआउट दाखवला आहे. हा स्टॉक सध्या मंदीमध्ये जाण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे यात नफा बुकिंग आवश्यक आहे. दरम्यान , ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्स स्टॉकवर 443 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल

इंडियन हॉटेल्स कंपनीने मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 1002 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 247.72 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 720.11 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता.

मार्च 2022 या आर्थिक वर्षात कंपनीची विक्री 3056.22 कोटी रुपयांवरून मार्च 2023 मध्ये 90.10 टक्के वाढीसह 5809.91 कोटी रुपयेवर पोहचली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीची विक्री 86.39 टक्के वाढीसह 1625.43 कोटी रुपयेवर पोहचली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीने 342.47 टक्के वाढीसह 328.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत 74.19 कोटी रुपये होता.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Indian Hotels Share Price today on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#Indian Hotels Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x