23 February 2025 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Inflation Hike | मोदी है तो मुमकिन है | पेट्रोल-डिझेल अजून महागलं | महागाई सामान्यांचं कंबरडं मोडणार

Inflation Hike

मुंबई, ०१ ऑक्टोबर | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत. आगामी काळात कच्च्या तेलाचे भाव (Inflation Hike) वधारण्याची शक्यता आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्या आणखी किती काळ नुकसान सहन करत राहणार, हेदेखील पहावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

According to the announced rates of petrol (Inflation Hike), the price of petrol in Mumbai is Rs 107.95 per liter. A liter of diesel costs Rs 97.84. In Delhi, petrol and diesel are priced at Rs 101.89 and Rs 90.17, respectively :

पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.95 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.84रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.89 आणि 90.17 रुपये इतका आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

कमर्शियल एलपीजी सिलिंडर महागला:
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे. यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आदी ठिकाणी अन्न महाग होऊ शकते. (LPG Commercial cylinder expensive)

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Inflation Hike petrol diesel price increased today.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Inflation(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x