5 February 2025 11:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

मोदी सरकारच्या काळात रुपयातील कमकुवतपणामुळे महागाई आणखी वाढणार | आता हवालदिल जनतेला दांडीया इव्हेन्टमध्ये गुंतवणार?

Inflation in India

Inflation in India | अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.०९ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्चे तेल आणि अन्य वस्तूंची आयात महागणार असून, महागाई आणखी वाढेल. चलनवाढीचा दर आधीच रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ६ टक्क्यांच्या कमाल आरामदायी पातळीपेक्षा जास्त आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने वारंवार व्याजदरात वाढ केल्यामुळे भारतीय रुपयावरील दबावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी तूट आणि परकीय भांडवलाचा ओघ यामुळे वाढण्याची शक्यता आहे.

आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी कमिटी (एमपीसी) या आठवड्याच्या अखेरीस द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. यामध्ये महागाईचा दबाव कमी करण्यासाठी रेपो रेटमध्ये 0.50 टक्के वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो.

तेलाची ८५ टक्के गरज आणि ५० टक्के गॅसची गरज भागविण्यासाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत रुपयातील कमकुवतपणाचा परिणाम इंधनाच्या देशांतर्गत किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे आयात केलेल्या खाद्यतेलांचा खर्च वाढेल, असे मिलमालकांची संघटना असलेल्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले. त्याचा बोजा शेवटी ग्राहकांवरच पडणार आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये वनस्पती तेलाची आयात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४१.५५ टक्क्यांनी वाढून १.८९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या आयातीमुळे ऑगस्टमध्ये भारताची व्यापार तूट दुपटीहून अधिक वाढून २७.९८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. पेट्रोलियम, कच्चे तेल आणि उत्पादनांच्या आयातीत वर्षागणिक ८७.४४ टक्के वाढ होऊन यावर्षी ऑगस्टमध्ये ती १७.७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

‘आयसीआरए रेटिंग्ज’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, ‘रुपयातील घसरणीमुळे वस्तूंच्या किमतीतील घसरणीचा महागाईवर होणारा अनुकूल परिणाम काहीसा प्रभावित होईल.’ दरम्यान, आता राज्यात महत्वाच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे आणि सणासुदीत सामान्य लोकांमध्ये महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे गडद होऊ नये म्हणून भाजपने मुंबईतील सर्व भागात स्पॉन्सर्ड गरबा दांडिया इव्हेन्ट आयोजित केले आहे. त्यावेळी भाजप नेते महागाई – बेरोजगारी अशा महत्वाच्या विषयांना बगल देऊन याच इव्हेन्टमध्ये धार्मिक मुद्यांवर बोलताना दिसले तर नवल वाटायला नको.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Inflation in India after weakness in rupee will increase inflation import of crude oil check details 26 September 2022.

हॅशटॅग्स

#Inflation Alert(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x