5 November 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Infollion Research Services IPO | IPO आला रे! गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशीच 49 टक्के परतावा मिळणार? लिस्टिंगपूर्वी मोठी अपडेट

Highlights:

  • इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड IPO
  • ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स
  • पहिल्या दिवशीच 49 टक्के नफा मिळेल?
  • 5 जून 2023 रोजी शेअर्स वाटप
  • एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स
Infollion Research Services IPO

Infollion Research Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड’ ही कंपनी 29 मे 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आपला IPO लाँच करणार आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 21.45 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-82 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स
‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनीचा आयपीओ अद्याप सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला नाही, तरी देखील या कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 40 रुपयेवर पोहोचली आहे.

पहिल्या दिवशीच 49 टक्के नफा मिळेल?
जर या कंपनीचे IPO शेअर्स 82 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप केले गेले आणि 40 रुपये ग्रे मार्केट प्रीमियम टिकुन राहिला तर ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 122 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशीच 49 टक्के नफा मिळेल.

5 जून 2023 रोजी शेअर्स वाटप
‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनीने आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 1600 शेअर्स ठेवले आहेत. कंपनीचे IPO शेअर्स 5 जून 2023 रोजी वाटप केले जातील. आणि 8 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये फक्त 1 लॉटसाठी पैसे लावू शकतात.

एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स
एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 131,200 रुपये जमा करावे लागतील. उच्च नेट वर्थ असलेले गुंतवणुकदार किमान 2 लॉटसाठी म्हणजे 3200 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. म्हणजेच HNI ला गुंतवणूक करण्यासाठी 262,400 रुपये जमा करावे लागतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infollion Research Services IPO is ready to launch check details on 25 May 2023

FAQ's

How to buy Infollion Research Services IPO?

आपण Zerodha Kite, Angel One App, Upstox Pro, 5paisa, ICICI Direct App and Groww वर डीमॅट खाते तयार करून आणि केवायसी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी करून सबस्क्राईब करू शकता.

What happens after IPO is allotted?

एकदा वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, शेअर्स काही दिवसात एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातात जे नंतर ते ट्रेडिंगसाठी उघडतात. आगामी आयपीओ इव्हेंट्सबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी कंपन्या त्यांचे आयपीओ कॅलेंडर सार्वजनिक करतात.

How do you know whether IPO is allotted or not?

अलॉटमेंट झाल्यानंतर गुंतवणूकदार रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर (म्हणजे लिंकइनटाईम, कार्वी) जाऊन आयपीओ अलॉटमेंट चेक करू शकतात. आयपीओ गुंतवणूकदारांना बीएसई, एनएसई, सीडीएसएल आणि एनएसडीएलद्वारे नवीन आयपीओ वाटप स्थितीबद्दल ईमेल आणि एसएमएसद्वारे माहिती दिली जाते.

How does an IPO get allotted?

एखाद्या संस्थेने सर्वसामान्यांसाठी आयपीओ लाँच केल्यानंतर शेअर्ससाठीच्या सर्व निविदा ऑनलाइन नोंदवल्या जातात. त्यानंतर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे चुकीच्या पद्धतीने सादर केलेल्या सर्व अवैध निविदा एकूण निविदांच्या संख्येतून वगळल्या जातात. यासह, आपल्याकडे आता या आयपीओसाठी यशस्वी निविदांची अंतिम संख्या आहे.

Will I get my money back if IPO is not allotted?

आपण ती रक्कम काढू शकत नाही. आयपीओसाठी वाटप अंतिम होईपर्यंत ही रक्कम लॉक केली जाईल. जर तुम्ही चेकद्वारे ऑफलाइन अर्ज करत असाल तर अलॉटमेंटचा आधार निश्चित झाल्यानंतर परताव्याची प्रक्रिया सुरू होते. कोणतेही शुल्क आकारले जात नाही आणि संपूर्ण परतावा दिला जातो.

Is IPO allotted randomly?

आयपीओ जारी करणाऱ्या कंपनीद्वारे पूर्वनिर्धारित लॉट आकार निश्चित केला जातो. या लॉट आकाराच्या आधारे शेअर्सचे वाटप प्रो-राटा अलॉटमेंटच्या आधारे केले जाते.

What happens to money if IPO is not allocated?

शेअर्सचे वाटप/ अंशत: वाटप न झाल्यास भरलेली रक्कम परत केली जाईल. शेअर बाजारात शेअर्सचे व्यवहार सुरू होण्यासाठी आयपीओ इश्यू बंद होण्याच्या तारखेपासून साधारणपणे २ आठवडे लागतात.

हॅशटॅग्स

Infollion Research Services IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x