5 January 2025 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या
x

Multibagger Dividend | या शेअरच्या गुंतवणूकदारांना 620 टक्के डिव्हीडंड मिळणार, डिव्हीडंड देणारे शेअर्स नेहमी लक्षात ठेवा, फायदाच होतो

Multibagger Dividend

Multibagger Dividend | चालू वर्ष 2022 मध्ये आपण शेअर बाजारात मजबूत गोंधळ आणि अस्थिरता पाहू शकतो. जागतिक मंदी आणि रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण असतानाही काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदाराना लाभांश देऊन दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये इन्फोसिस ही एकमेव कंपनी होती, जिने आपल्या गुंतवणूकदारांना 620 टक्के लाभांश वितरीत केला होता. या IT कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. 13 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनी गुंतवणूकदारांना एक चांगली बातमी देणार आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे.

घोषणा काय असू शकते :
12-13 ऑक्टोबर 2022 रोजी इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळ तिमाही आर्थिक निकालाचा प्रस्ताव मान्य करतील. यासह, कंपनीचे संचालक मंडळ चालू आर्थिक वर्षासाठी प्रथमच अंतरिम लाभांश वितरीत करण्याची घोषणा करू शकतात. मागील वर्षी इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळाने 13 ऑक्टोबर 2021 रोजी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 रुपये लाभांश वितरीत केला होता.

कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये चालू वर्ष 2022 मध्ये 23.52 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे इन्फोसिस कंपनीच्या एका शेअरची किंमत 2022 च्या सुरुवातीला मध्ये 1898.45 रुपये होती, त्यात घट होऊन शेअरची किंमत सध्या 1452 रुपयांपर्यंत खाली पडली आहे. मागील 6 महिन्यांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपणास समजेल की, इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी पडले आहेत. त्याचवेळी, मागील एका महिन्यात इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 1.62 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. इन्फोसिस ही आयटी क्षेत्रातील दिग्गज मोठी असून कंपनीचे बाजार भांडवल 6,10,871.36 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Infosys limited is going to announce Multibagger Dividend soon and record date will be decided in BOD meeting 10 October 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Dividend(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x