22 April 2025 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRFC Share Price | 433 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Infosys Share Price | इन्फोसिस शेअर ब्रेकआऊट देणार! सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा, फायदाच फायदा

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्क्यांच्या वाढीसह 1539 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर हा स्टॉक 4.13 टक्के वाढीसह 1533.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,731 रुपये होती. ( इन्फोसिस कंपनी अंश )

जून 2023 मध्ये हा स्टॉक 1,262.30 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.10 टक्के घसरणीसह 1,501.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात हा स्टॉक 1585 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सने 1480 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकमध्ये 1,500 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर या स्टॉकची ब्रेकआऊट किंमत पातळी 1,550 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी इन्फोसिस स्टॉकची ट्रेडिंग रेंज 1475 ते 1600 रुपये दरम्यान असेल. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने देखील हा स्टॉक 1580 रुपये टार्गेट प्राइस खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1490 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

इन्फोसिस कंपनीने मार्च तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 30 टक्के वाढीसह 7,969 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 6128 कोटी रुपये नफा कमावला आहे. मार्च 2024 तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 1.3 टक्के वाढीसह 37,923 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 37441 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

इन्फोसिस कंपनीच्या अंदाजाप्रमाणे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीच्या महसुलात 1.3 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. या कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 20 ते 22 टक्के राहण्याची शक्यता आहे. इन्फोसिस कंपनीने मागील वर्षी मार्च तिमाहीत 20.1 टक्के ऑपरेटिंग मार्जिन नोंदवले होते. तर संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीने 20.7 टक्के ऑपरेटिंग मार्जिन नोंदवला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 10 June 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या