15 January 2025 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Infosys Share Price | इन्फोसिस आणि RVNL सहित हे 4 शेअर्स रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. बऱ्याच कंपन्यांनी नवीन ऑर्डर मिळाल्याची किंवा नवीन करारनामे केल्याची अपडेट सेबीला कळवली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स देखील तज्ञांच्या रडारवर आले आहेत. सध्या नवीन ऑर्डर्स आणि कारारांच्या बातमीमुळे रेल विकास निगम लिमिटेड, इन्फोसिस, अद्वैत इन्फ्राटेक, शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आले आहेत.

आरव्हीएनएल :
या कंपनीने नुकताच दक्षिण पूर्व रेल्वेकडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळवला आहे. या कंपनीने 203 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डरसाठी सर्वात कमी बोली लावली होती. यासह कंपनीला 187.34 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकने देखील ऑर्डर दिली आहे. आरव्हीएनएल कंपनीने TATWEER Middle East & Africa LLC सोबत सामंजस्य करार केल्याची अपडेट सेबीला कळवली आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.24 टक्के वाढीसह 623.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

INFOSYS :
भारतातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसला देखील भरघोस ऑर्डर्स मिळाल्या आहेत. नुकताच इन्फोसिस कंपनीने युरोपातील आघाडीची सुरक्षा प्रदाता कंपनी Sector Alarm सोबत 5 वर्षांचा करार केला आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,652.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अद्वैत इन्फ्राटेक :
या कंपनीचे शेअर्स देखील नवीन ऑर्डर्सच्या अपडेटमुळे चर्चेत आले आहे. नुकताच या कंपनीला केपी ग्रुप ऑफ कंपनीने 59 कोटी रुपये आणि 13.69 कोटी रुपये मूल्याच्या दोन ऑर्डर दिल्या आहेत. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला 30 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आणि एक एमव्ही ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्याचे काम देण्यात आले आहेत. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 1960 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट :
नुकताच या कंपनीला विविध नागरी कामांसाठी अपार इंडस्ट्रीज आणि मास्टरकूक हाउसवेअर एलएलपी कंपनीकडून 8.5 कोटी रुपये मूल्याच्या वर्क ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय कंपनीला अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीकडून देखील 899 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के वाढीसह 7.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 11 July 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x