24 December 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

Infosys Share Price | IT स्टॉक ब्रेकआऊट देणार? इन्फोसिस शेअर 'BUY' करावा की 'Sell' करावा?

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसांपासून भारतात आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स संथ गतीने व्यवहार करताना पाहायला मिळत आहेत. इन्फोसिस स्टॉक मागील 6 महिन्यांत फक्त 2.86 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6.35 लाख कोटी रुपये होते. अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे मागील काही दिवसांपासून आयटी क्षेत्रात मंदी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.037 टक्के घसरणीसह 1,499.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च 2024 तिमाहीच्या निकालानंतर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल अशी अपेक्षा होती, मात्र आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये परिणाम पाहायला मिळत नाही. अमेरिकेच्या स्टँडर्ड अँड पुअर्स इंडेक्समधील टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता 2024 मध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचा कमाईचा दृष्टिकोन कमजोर झाला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात ऊर्जा, उपकरण, ग्राहक वस्तू, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्र मजबूत कमाई करून देऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हे क्षेत्र आकर्षक वाटत आहेत. 31 मे 2024 रोजी BofA ने विविध टेक कंपन्यांचे 2.2 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स विकले होते. अजूनही गुंतवणुकदार आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास उत्साही दिसत नाही.

स्टँडर्ड अँड पुअर्स-500 मध्ये आतापर्यंत 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. अमेरिकेतील पाच सर्वात मोठे स्टॉक असलेले मायक्रोसॉफ्ट, ऍपल, एनव्हीडिया, अल्फाबेट आणि ॲमेझॉन या आयटी कंपन्यांचे बाजार मुल्य 2024 मध्ये 2.9 ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 11 June 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(77)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x