22 November 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर्स खरेदीसाठी गुंतवणुकीसाठी झुंबड, स्टॉक वाढीचे कारण काय?

Infosys Share Price

Infosys Share Price| इन्फोसिस या भारतातील दिग्गज आयटी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 मध्ये इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 7.3 टक्क्यांच्या घसरणीसह 6,106 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीचा निव्वळ नफा 6,586 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे परिचालन उत्पन्न 1.3 टक्क्यांच्या वाढीसह 38,821 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 6.60 टक्के वाढीसह 1,592.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील वर्षी याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीने 38,318 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. इन्फोसिस कंपनीने चालू आर्थिक वर्षात आपल्या महसूल वाढीचा अंदाज 1-2.5 टक्क्यांवरून 1.5-2 टक्के केला आहे . कंपनीच्या मते, संचालक मंडळाने बेंगळुरूस्थित सेमीकंडक्टर डिझाइन सेवा प्रदाता इन्सेमी कंपनी 280 कोटी रुपयेमध्ये खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

इन्फोसिस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, इन्सेमी कंपनीचे अधिग्रहण आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीमध्ये पूर्ण होऊ शकते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 1495 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस स्टॉकची किंमत 7.58 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x