15 January 2025 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Infosys Share Price | संधी सोडू नका! इन्फोसिस शेअर मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी आपले जून 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि HCL टेक्नॉलॉजी कंपनीने चांगले निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे आता बाजाराला इन्फोसिस कंपनीकडून देखील सकारात्मक आर्थिक निकालाची अपेक्षा आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )

गुरूवारी निकालापूर्वी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 1740 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभरात या स्टॉकने 1745.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 2.63 टक्के वाढीसह 1,804.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांना इन्फोसिस कंपनीच्या उत्पन्नात 3 टक्के वाढ होण्याची आणि मार्जिन विस्ताराची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात टीसीएस आणि एचसीएल टेक कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. अमेरिकेत महागाईमध्ये आलेली नरमाई आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीची चर्चा केल्याने अनेक कंपनीच्या व्यावसायिक दृष्टिकोनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जून तिमाहीत इन्फोसिस कंपनीच्या शेअरवर परिमाण करणारा तिमाही निकाल हा एकमेव घटक असणार नाही.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकने 1675 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर या स्टॉकला 1800 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसात इन्फोसिस कंपनीच्या शेअरची किंमत 1850 रुपये किमतीवर पोहोचू शकते. तसेच तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 1675 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 19 July 2024.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(81)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x