22 January 2025 1:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढला, IT स्टॉक अजून किती घसरणार?

Infosys Share Price

Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोल्यूशन्स संबंधित एक करार केला होता, जो कंपनीने रद्द केला आहे. त्यामुळे आजइन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. इन्फोसिस कंपनीच्या एआय संबधित या कराराचे मूल्य दीड अब्ज डॉलर होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सलील पारेख यांच्या नेतृत्वाखालील इन्फोसिस कंपनीने 14 सप्टेंबर 2023 रोजी 15 वर्षांसाठी 1.5 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास भारतीय चलनात 12500 कोटी रुपये मूल्याचा करार केल्याची माहिती दिली होती.

आता इन्फोसिस कंपनीने सेबीला कळवले आहे की, इन्फोसिस कंपनीने हा एमओयू समाप्त करण्याचा निर्णय घेतला असून आपण मास्टर कराराला मुदत वाढ देणार नाही. त्यामुळे इन्फोसिस कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस स्टॉक 1.84 टक्के घसरणीसह 1,534.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इन्फोसिस कंपनी AI करारा अंतर्गत आपल्या प्लॅटफॉर्मचा आणि एआय सोल्यूशन्सचा वापर करून डिजिटल परिवर्तन आणि व्यवसाय ऑपरेशन्स सेवांचे आधुनिकीकरण करणार होती. तथापि इन्फोसिस कंपनीने करार मोडणाऱ्या कंपनीचे नाव जाहीर केले नाहीये. करार रद्द करण्यामागचे कारण देखील इन्फोसिस कंपनीने अद्याप जाहीर केले नाहीये. नुकताच इन्फोसिस कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी पदावर काम करणाऱ्या निलांजन रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदत्याग केला होता, त्यामुळे देखील कंपनीच्या शेअरमध्ये बरीच घसरण झाली होती.

मागील काही महिन्यांत इन्फोसिस कंपनीने अनेक मोठ्या डील केल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात इन्फोसिस कंपनीने ऑटो पार्ट्स वितरक LKQ युरोप कंपनीसोबतचा 5 वर्ष मुदतीचा करार जिंकल्याची माहिती जाहीर केली होती. इन्फोसिस कंपनीने नुकताच लंडनस्थित लिबर्टी ग्लोबल कंपनीसोबत पाच वर्ष मुदतीसाठी 1.64 अब्ज डॉलर्स मूल्याचा करार केला आहे. यासह इन्फोसिस कंपनीने Danske बँकेसह 454 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा करार केला आहे.

इन्फोसिस कंपनी 11 जानेवारी 2024 रोजी आपले तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 7.7 अब्ज डॉलर्स मूल्याचे डील केले असल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इन्फोसिस कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.

22 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 1.75 टक्क्यांच्या वाढीसह 1562.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने इन्फोसिस कंपनीच्या शेअरवर BUY रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1870 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(83)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x