Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सचे गुंतवणुकदार चिंतित, स्टॉक घसरणीचं नेमकं कारण काय?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर मध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स1 टक्क्यांनी घसरले होते. तर इंट्रा-डे ट्रेडमध्ये इन्फोसिस स्टॉक 1.2 टक्क्यांच्या घसरणीसह 1560.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज देखील या स्टॉक मध्ये प्रचंड नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इन्फोसिस कंपनीचे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर कंपनीचे शेअर्स अस्थिर झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.60 टक्के घसरणीसह 1,555 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर रोजी इन्फोसिस स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला होता. शेअर बाजारातील सकारात्मक भावना तसेच त्याच्या व्यावसायिक उलाढालीमुळे इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली होती.
या कंपनीने 15 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे अत्याधुनिक विकास केंद्राचे उद्घाटन केले आहे. इन्फोसिस कंपनीने शनिवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सेबीला कळवले की, कंपनीने हा केंद्राची उभारणी करण्यासाठी 230 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
इन्फोसिस कंपनी या नवीन केंद्राद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना हायब्रीड मोडमध्ये म्हणजेच ऑफिस आणि घरातून काम करण्याची लवचिकता प्रदान करणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे री स्किलिंग आणि अप-स्किलिंग केले जाणार आहे. सेबी फाइलिंगनुसार कंपनीचे कर्मचारी या नवीन केंद्रात क्लाउड आणि एआय सारख्या पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करू शकतील.
या नवीन केंद्रात इन्फोसिस कंपनीचे तीन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करू शकतील. यामध्ये लो एनर्जी कूलिंग, स्मार्ट बिल्डिंग ऑटोमेशन, कार्यक्षम रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सांडपाण्याचा पूर्ण पुनर्वापर यासारख्या अनेक आधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Infosys Share Price NSE 19 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC