18 November 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Innovana Thinklabs Share Price | जबरदस्त IT कंपनी शेअर! गुंतवणूकदारांना 562% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट?

Innovana Thinklabs Share Price

Innovana Thinklabs Share Price | ‘इनोवाना थिंकलॅब’ ही आयटी उद्योगांशी संबंधित स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी एकूण 1,02,50,000 इक्विटी शेअर जारी करणार आहे. ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 30 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले फुल्ली पेड शेअर्स बोनस म्हणून वाटप करण्याचे निश्चित केले आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 625 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Innovana Thinklabs Limited)

गुंतवणूकदारांना 562.08 टक्के परतावा
‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 740 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 562.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 738,58 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 48 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 740 रुपये होती, तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 250 रुपये होती.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
आर्थिक वर्ष 2021 मध्ये ‘इनोवाना थिंकलॅब’ कंपनीने एकूण 60.61 कोटी रुपये कमाई केली होती. तर 2022 मध्ये कंपनीने 61.92 कोटी रुपये कमाई केली होती. वित्तीय वर्ष 2022 मध्ये कंपनीचा एकूण खर्च 35.58 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये सुमारे 41.75 कोटी रुपये होता. त्याच वेळी आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने एकूण 15.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 21.47 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Innovana Thinklabs Share Price NSE on 27 March 2023.

हॅशटॅग्स

Innovana Thinklabs Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x