22 November 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

IPO in Focus | गौतम अदानींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये चर्चा, शेअरची प्राइज बँड पहा

 IPO in Focus

IPO in Focus | Inox Green Energy Services Limited कंपनीचा IPO 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. INOX ग्रीन एनर्जी IPO 11 नोव्हेंबर 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या IPO मध्ये शेअर 61-65 रुपये प्रति शेअर या दराने जारी केले जातील.

740 कोटी उभारण्याचे लक्ष्य :
INOX एनर्जी कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 740 कोटी जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये 370 कोटी रुपयेचे फ्रेश शेअर्स जारी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तर उर्वरित 370 कोटी ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर बाजारातून उभारले जाणार आहे. शेअरचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 10 रुपये आहे. या IPO मधून उभारलेली सर्व रक्कम कंपनी नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांमध्ये लागणारे खरेच भागवण्यासाठी वापरणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत :
आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होण्याच्या आधी ग्रे मार्केटमध्ये तेजीत प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर मार्केट तज्ञाच्या मते, INOX ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 च्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटमधील गुंतवणुकदारांना अशी अपेक्षा आहे की, आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनीचा आयपीओ 77 (65 + 12) रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. हे प्रमाण आयनॉक्सच्या इश्यू किमतीच्या 18.50 टक्के जास्त आहे.

गौतम अदानी यांची गुंतवणूक :
INOX ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी आयनॉक्स विंड या कंपनीची उपकंपनी असून ती गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या विकसित राज्यात आपला उद्योग व्यवसाय करते. आयनॉक्स ग्रीन एनर्जी ही कंपनी जीएफएल ग्रुपचा एक भाग आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीमध्ये सध्या आयनॉक्स विंडचा 93.84 टक्के मालकी वाटा आहे. अलीकडेच आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीने गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला आपल्या तीन स्पेशल युनिट्स मधील संपूर्ण इक्विटी हिस्सा विकला आहे. म्हणजेच गौतम अदानी यांनी INOX ग्रीन या कंपनीत गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| INOX Green Energy services limited IPO in Focus of Gray Market investors on 10 November 2022.

हॅशटॅग्स

IPO in Focus(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x