18 November 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Inox Wind Energy Share Price | आयनॉक्स विंड एनर्जी स्टॉकबाबत मोठी बातमी आली, गुंतवणुकदार याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतात

Inox Wind Energy Share Price

Inox Wind Energy Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 2,150 रुपये या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचले होते. तर आयनॉक्स विंड स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 138.50 रुपये किमतीवर आला होता.

भारतातील आघडीच्या पवन ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता, आयनॉक्स विंड कंपनीने एक धोरणात्मक निर्णय म्हणून, संचालक मंडळाने आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीला आयनॉक्स विंडमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विलीनीकरण अद्याप विविध नियामक मंजुरींच्या अधीन आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 2,115.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीच्या प्रत्येक 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्ससाठी कंपनीने 54 रुपये इश्यू किंमत निश्चित केली आहे. आयनॉक्स विंड कंपनीच्या संचालक मंडळाने 158 इक्विटी शेअर्सच्या प्रस्तावित विलीनीकरणासाठी स्वॅप रेशोला मान्यता दिली आहे. ज्यासाठी आयनॉक्स विंड एनर्जी कंपनीचे 10 शेअर्स 847 रुपये किमतीवर वाटप केले जाणार आहे.

आयनॉक्स विंड कंपनीने सांगितले की विलीनीकरणाचा उद्देश सूचीबद्ध कंपन्यांची संख्या कमी करून समूह संरचना सुलभ करणे आणि कंपनीचे काम सुव्यवस्थित करणे आहे.

INOX विंड एनर्जी कंपनी पवन ऊर्जेचे उत्पादन आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. कंपनी विंड फार्मचे बांधकाम, वीज खरेदी आणि कार्यान्वित करणे, ऊर्जा सेवा प्रदान करणे, यासारखे काम करते. ही कंपनी अक्षय उर्जेमध्ये धोरणात्मक व्यावसायिक क्षेत्रात स्वारस्य ठेवते.

आयनॉक्स विंड कंपनी ही मुख्यतः विंड टर्बाइन जनरेटरची निर्मिती आणि विक्री करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी WTGs आणि विंड फार्म विकास सेवांसाठी EPC, ऑपरेशन आणि देखभाल तसेच सामान्य पायाभूत सेवा प्रदान करण्याचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Energy Share Price today on 14 June 2023.

हॅशटॅग्स

Inox Wind Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x