3 July 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! 31 रुपयाच्या शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, संधी सोडू नका HDFC Bank Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेले 10 शेअर्स, AXIS ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला, किती कमाई? Infosys Share Price | इन्फोसिस, TCS, विप्रो सहित हे 6 आयटी शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग Gold Rate Today | खुशखबर! आजही स्वस्तात सोनं खरेदीची संधी, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | हा पेनी शेअर खरेदी करा, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा IREDA Share Price | PSU शेअर तुफान तेजीत, शॉर्ट टर्म मध्ये 43% परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला L&T Share Price | तज्ज्ञांकडून L&T शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक 4000 रुपयांच्या पार जाणार, संधी सोडू नका
x

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, देणार मजबूत परतावा, यापूर्वी दिला 600% परतावा

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आपले लक्ष अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर केंद्रीत केल्याने पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकार 2032 पर्यंत पवन ऊर्जा क्षमता 75GW पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. आयनॉक्स विंड ही कंपनी एकात्मिक पवन ऊर्जा सोल्यूशन प्रदान करणारी कंपनी आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

आयनॉक्स विंड कंपनी मुख्यतः विंड टर्बाइन जनरेटर निर्मिती आणि वीज विक्रीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने आयनॉक्स विंड स्टॉक 12 ते 18 महिन्यांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 1.23 टक्के वाढीसह 143.60 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

Axis Direct फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, आयनॉक्स विंड ही कंपनी WTGs आणि विंड फार्म विकास सेवांसाठी बांधकाम, खरेदी आणि कमिशनिंग, ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स आणि सामान्य पायाभूत सुविधा सेवा देखील प्रदान करते. ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत आयनॉक्स विंड स्टॉकचे EPS 30 पट अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

आयनॉक्स विंड कंपनीकडे भारतातील वाढत्या पवन ऊर्जा क्षेत्राचा मोठा वाटा काबीज करण्याची क्षमता आहे. सध्या आयनॉक्स विंड कंपनीकडे 2.7 GW ची मजबूत ऑर्डर बुक आहे. आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये आयनॉक्स विंड कंपनीची वीज निर्मिती क्षमता 104 MW होती, जी 2023-2024 मध्ये 376 MW नोंदवली गेली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या वीज निर्मितीमध्ये 262 टक्के वाढ झाली आहे.

तज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2024-27 मध्ये कंपनीचा महसूल/EBITDA CAGR 75 टक्के आणि PAT 1,081 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये आयनॉक्स विंड कंपनीला 51 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. पुढील आर्थिक वर्षात ही कंपनी नफ्यात येईल अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ब्रोकरेज फर्म ॲक्सिस डायरेक्टने आयनॉक्स विंड स्टॉकवर 185 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. 28 जून 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 0.93 टक्क्यांच्या वाढीसह 141.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. ब्रोकरेज फर्मने 12 ते 18 महिन्यांसाठी आयनॉक्स विंड स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 6 महिन्यांत आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 261 टक्के मजबूत झाले आहे. तर मागील दोन वर्षांत आयनॉक्स विंड स्टॉकची किंमत 600 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 177 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 38 रुपये होती. आयनॉक्स विंड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 18,481.28 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 01 July 2024.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x