25 November 2024 7:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअर ओव्हरबॉट झोनच्या दिशेने, तेजीचे संकेत, यापूर्वी दिला 1789% परतावा

Inox Wind Share Price

Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड या हरित ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 13.14 टक्क्यांच्या वाढीसह 235 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला कमर्शियल अँड इंडस्ट्रियल क्षेत्रातील Evernew Energy Private Limited कंपनीकडून 51 MW क्षमतेची ऑर्डर मिळाली आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )

कॉन्ट्रॅक्ट ऑर्डरनुसार, आयनॉक्स विंड कंपनीला 3 मेगावॅटचे विंड टर्बाइन जनरेटरचा पुरवठा करायचा आहे. तसेच कंपनीला प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी आयनॉक्स विंड स्टॉक 2.09 टक्के घसरणीसह 211.28 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. सोमवारी आयनॉक्स विंड कंपनीचे शेअर्स 19.4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

आयनॉक्स विंड कंपनीने जून तिमाहीमध्ये 83 टक्के वाढीसह 638.81 कोटी रुपये कमाई केली आहे. जून तिमाहीत आयनॉक्स विंड कंपनीचा करपूर्व नफा 48.01 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत हे प्रमाण 63.49 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 157 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील वर्षी याच तिमाहीत 35 कोटी रुपये होता.

मागील एका वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 337 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्के वाढली आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 697 टक्के वाढली आहे. मागील 5 वर्षांत आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1789 टक्के नफा कमावून दिला आहे.

आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सचा आरएसआय सध्या 64.3 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनच्या दिशेने जात आहे. सध्या हा स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, हे 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Wind Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

Inox Wind Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x