18 November 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024
x

Integra Essentia Share Price | फुकट शेअर्स मिळवा, पेनी शेअरची किंमत 11 रुपये, 5 दिवसात दिला 67% परतावा

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | मागील काही दिवसापासून तेजीत धावणाऱ्या इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सच्या गतीला ब्रेक लागला आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 11.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे.

मागील अवघ्या 5 दिवसात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 67 टक्के वाढली होती. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही स्मॉलकॅप कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 4.29 टक्के घसरणीसह 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 11 जानेवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ही स्मॉलकॅप कंपनी पहिल्यांदाच आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 36 पैसेवरून वाढून 11 रुपये किमतीवर पोहोचली आहे.

28 जानेवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 36 पैशांवर ट्रेड करत होते. तर 4 जानेवारी 2024 रोजी हा स्टॉक 11.71 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 3 वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3153 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 707 टक्के मजबूत झाली आहे.

3 जानेवारी 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 10 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने लोकांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे. LIC सारख्या दिग्गज कंपनीने देखील 48 लाख शेअर्स खरेदी करून इंटेग्रा एसेंशिया कंपनीत गुंतवणूक केली आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे जवळपास 1.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 11.71 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.10 रुपये होती. इंटेग्रा एसेंशिया कंपनी कृषी उत्पादने, कपडे, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE 05 January 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x