15 January 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 4 रुपये! शॉट टर्म मध्ये दिला 480% परतावा, कमाईची संधी सोडू नका

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसण्याचे कारण म्हणजे, कंपनीला कृषी आणि पायाभूत सुविधा संबधित 280 दशलक्ष रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनीच्या उत्पादनांबाबत आणि सेवांबाबत ग्राहकांचा असलेला विश्वास आणि गुणवत्ता प्रतिबिंबित करते. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )

या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 423.87 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 2.01 टक्के घसरणीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 3 वर्षांत इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 480 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीने 2023 मध्ये आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

इंटेग्रा एसेंशिया ही कंपनी 2007 साली स्थापन झाली होती. ही कंपनी मुख्यतः कृषी उत्पादने, कपडे , पायाभूत सुविधा जसे बांधकाम, विकास साहित्य आणि सेवा आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा उपकरणे यासह जीवनावश्यक गोष्टींमध्ये एक्स्पर्ट मानली जाते. जून 2024 तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया या कंपनीने 86.06 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 55 कोटी महसूल संकलित केला होता. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 56 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

जून तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया कंपनीचा ऑपरेटिंग नफा 2.05 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2.45 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 1.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर 2023-24 मध्ये या कंपनीने 277 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर याकाळात कंपनीचा ऑपरेटिंग नफा 5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 2022-23 मध्ये या कंपनीने 15 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price NSE Live 05 August 2024.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x