30 January 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | सरकारी बँकेचा फंड, 1 लाख गुंतवणुकीचे होतील 1.32 कोटी रुपये, तर 5000 ची SIP देईल 50 लाख रुपये Gold Rate Today | बापरे, आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, 5260 रुपयांनी वाढला दर, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Suzlon Share Price | एनर्जी कंपनी शेअर फोकसमध्ये, सुझलॉन शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Home Loan EMI | 20,000 रुपयांच्या पगारात किती लाखांचे गृहकर्ज मिळेल, EMI कितीचा बसेल, सर्वसामान्य व्यक्तीसाठी बातमी UPI ID | UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट, 1 फेब्रुवारीपासून थेट ब्लॉक होणार अशा प्रकारचे ट्रांजेक्शन, अपडेट जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, मिळेल 70% परतावा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार - NSE: TATAMOTORS HUDCO Share Price | फायदा घ्या, हा सरकारी कंपनीचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
x

Intellect Design Arena Share Price | 'इंटेलेक्ट डिजाइन एरिना' कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत, अल्पावधीत 610 टक्के परतावा दिला

Intellect Design Arena Share Price

Intellect Design Arena Share Price | सध्या शेअर बाजारात मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा सिझन सुरू आहे. अनेक कंपन्यां आपले मार्च तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर करत आहेत. या कंपन्यांच्या यादीत आता ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीचे नाव देखील सामील झाले आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे.

निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 541.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या मजबूत तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीने 95.26 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी मार्च तिमाहीत कंपनीने 615.50 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मार्च 2022 मध्ये कंपनीने 509.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. म्हणजेच वर्ष-दर-वर्ष आधारावर ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या महसुलात 21 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने 5रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 2.5 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 14.07 टक्क्यांच्या वाढीसह 532 रुपयेकिमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के नफा कमावून दिला आहे.

3 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 610 टक्के वाढले आहे. ‘इंटेलेक्ट डिजाइन एरिना लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 719 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 388.65 रुपये प्रति शेअर होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Intellect Design Arena Share Price today on 15 May 2023.

हॅशटॅग्स

#Intellect Design Arena Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x