22 January 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

Investment Planning | तुमचा मासिक पगार 30 ते 50 हजार रुपये असेल तर असे आर्थिक नियोजन करा, आर्थिक भविष्यकाळ भक्कम होईल

Investment planning

Investment Planning | नोकरदार वर्गाची नेहमीच अशी तक्रार असते की ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे बचत आणि गुंतवणूक करून आर्थिक नियोजन करू शकत नाहीत. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल जे वाढत्या महागाईने त्रस्त आहेत, आणि भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल, तर काळजी करू नका, जर तुमचा पगार 30 ते 50 हजार रुपये मासिक असेल तर आम्ही तुम्हाला या लेखात आर्थिक नियोजनासोबतच गुंतवणुकीची अचूक माहिती देणार ​​आहोत. यासोबतच दरमहा किती पैसे बचत करायचे हे देखील सांगणार आहोत.

पगारातील 20 ते 25 टक्के रक्कम बचत करा :
आर्थिक तज्ञ म्हणतात की कोणत्याही नोकरी व्यवसायातील लोकांनी दरमहा त्यांच्या पगारातील किमान 20 ते 25 टक्के बचत करावी. पगार 50 हजार रुपये असेल तर दरमहा किमान 10 हजार रुपये बचत झाली पाहिजे. मात्र, ज्यांचे पगार कमी आहेत त्यांच्यासाठी हे थोडे कठीण होऊ शकते. अशा लोकांनी अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा विचार केला पाहिजे.

निवृत्तीसाठी PPF आणि NPS मध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळत आहे. व्याजदराची गणना ददर तिमाही आधारावर केली जाते. त्याच वेळी, नॅशनल पेन्शन योजनेत 8 ते 10 टक्के परतावा दिला जातो. दोन्ही योजनांवर आयकर सवलत दिली जाते. जर तुम्ही PPM मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सवलत मिळू शकते. त्याच वेळी, NPS वर, तुम्हाला 50 हजार रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जाते.

इक्विटी लिंक्ड बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा :
तुमचे वार्षिक उत्पन्न जेर करपात्र असेल तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम ही एक उत्तम गुंतवणूक योजना आहे. या योजनेत, 80 टक्के गुंतवणूक इक्विटीमध्ये केली जाते. ज्यामुळे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळतो. यासाठी किमान 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. आणि यामध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायदा कलम 80C अंतर्गत सवलत मिळते. गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त असेल तितका नकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी असते.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक :
आजच्या काळात पगारातून दर मासिक गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड हा जबरदस्त पर्याय आहे. यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे तुमच्या सोयीनुसार पैसे गुंतवणूक करू शकता. तथापि, कधीही गुंतवणूक करण्यापूर्वी, तुमची कमाई आणि आर्थिक उद्दिष्टे विचारात घ्या. त्याच वेळी, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी, निश्चितपणे संपूर्ण माहिती गोळा करा. म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून तुम्हाला दीर्घ मुदतीत भरघोस परतावा मिळेल.

मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक :
तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकता. पाच वर्षांच्या FD वर देखील कर सवलत मिळते. मात्र, सध्या यावर फारच कमी व्याज परतावा मिळत आहे. अलीकडच्या काळात बँकांनी एफडीवर वाढीव व्याज द्यायला सुरुवात केली आहे. येत्या पुढील काळात तुम्हाला यावर 6 ते 8 टक्के परतावा हमखास मिळेल. मुदत ठेव योजना ही गुंतवणुकीचे लोकप्रिय पारंपरिक साधन आहे. तथापि, ते खूप कमी परतावा मिळवून देते. त्या तुलनेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यांसारख्या छोट्या बचत योजनांवर जास्त नफा मिळतो.

आपत्कालीन निधी :
निवृत्तीसाठी पैसे जोडण्याव्यतिरिक्त, नोकरी गमावण्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी एक आपत्कालीन फंड बनवा. हा आपत्कालीन फंड तुमच्या किमान 5 ते 6 महिन्यांच्या पगाराइतका असला पाहिजे. हे पैसे तुम्हाला वाईट काळात खूप मदत करतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment planning and benefits for low salary person on 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Investment Planning(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x