Investment Tips | या सरकारी योजनेत छोटी गुंतवणूक करून मिळवा दरमहा पेन्शन, योजनेत करसूट सोबत मिळणार बरेच फायदे
Investment Tips | निवृत्तीपूर्वी पेन्शनचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही सेवानिवृत्तीनंतर तुमचे आर्थिक जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एक सरकारी पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत जिचे नाव आहे, “अटल पेन्शन योजना”. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने खाते उघडून दरमहा 3,000 रुपये पेन्शन कमवू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. चला तर मग जाणून घे अटल पेन्शन योजनेचे फायदे
अटल पेन्शन योजना :
अटल पेन्शन योजना एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,000, 2000 रुपये, 3000, 4000 आणि कमाल 5,000 रुपये किमान मासिक पेन्शन मिळू शकते. ही योजना एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानली जाते.
गुंतवणूकीची पात्रता :
अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. त्यावेळी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी सुरू केली होती, परंतु आता कोणताही भारतीय नागरिक ज्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे ते या योजनेत पैसे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळायला सुरुवात होते.
3,000 रुपये पेन्शनचे गणित :
40 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. जर समजा तुमच्या पत्नीचे वय 25 वर्ष असेल, तर तुम्ही दरमहा 226 रुपये APY योजनेत जमा करावे लागेल, तर मुदत पूर्ण झाल्यावर तुमच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळेल. जर तुमच्या पत्नीचे वय 39 वर्षे असेल, तर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी APY खात्यात 792 रुपये जमा करावे लागतील. या योजनेत गुंतवणूक केल्यास गॅरंटीड मासिक पेन्शन तर मिळणार. जर खातेदाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला प्रत्येक महिन्याला पूर्ण आयुष्य पेन्शन दिली जाईल आणि सोबत 5.1 लाख रुपयेही मिळतील.
योजनेचे इतर फायदे :
या पेन्शन योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू करु शकतात. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे असावे. एकावेळी तुम्ही एकच अटल पेन्शन खाते सुरू करू शकता. या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली, तर वयाच्या 60 व्या वर्षी 5000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा साठी फक्त 210 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल.
गुंतवणुकीवर कर सवलत :
जर तुम्ही आयकर भरत असेल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतही मिळेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यां लोकांना आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन आणि विमा लाभ दिला जातो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Investment tips in Atal Pension Scheme for lifetime pension and life insurance benefits on 18 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय