23 February 2025 8:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Investment Tips | या योजनेत 7 रुपये जमा करून मिळवा 60 हजार पेन्शन आणि कर सवलतही, सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

Investment tips

Investment Tips | सध्याच्या महागाईच्या युगात प्रत्येकाला आपली वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. आजकाल महागाई जास्त, बेरोजगारी, आणि असुरक्षित वातावरण, या मुळे आपण नेहमी चिंतेत असतो. त्यासाठी आपण आपले भविष्य आर्थिकरित्या सुरक्षित केले पाहिजे. तुम्हालाही तुमचे म्हातारपण आर्थिक रित्या सुरक्षित आणि स्वतंत्र बनवायचे असेल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका सरकारी पेन्शन योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मासिक वृद्धापकाळात दर महा पेन्शन मिळवू शकता. या पेन्शन योजनेचे नाव आहे : अटल पेन्शन योजना. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर या योजनेबद्दल

अटल पेन्शन योजना :
अटल पेन्शन योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. यापूर्वी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चालू होती, परंतु आता 18 ते 40 वर्षे वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही योजना खुली करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेत योजनाधारकाना 60 वर्षांनंतर पेन्शन सुरू होते. या योजनेत, तुम्ही 1,000, 2000 रुपये, रुपये 3000, रुपये 4000 आणि कमाल रुपये 5,000 मासिक पेन्शन मिळवू शकतात. ही एक सरकारी पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला सुरक्षेची हमी दिली जाते. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे बँक बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

योजनेचे फायदे :
सरकारद्वारे संचालित या पेन्शन योजनेत तुम्ही वयाच्या जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली तर, वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी फक्त 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागेलं. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक करताना वेळेची विशेष काळजी घ्यावी लागते.

5,000 रुपये मासिक पेन्शन कसे मिळवाल? :
आता या योजनेच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊ. या पेन्शन योजनेत तुम्ही दिवसाला फक्त 7 रुपये जमा केले तर तुम्हाला मुदतपुर्तिवर दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळेल. त्याच वेळी, जर तुम्ही यामध्ये दरमहा 42 रुपये जमा केले तर तुम्ही 1000 रुपये मासिक पेन्शन मिळण्यास पात्र व्हाल. तुम्हाला 2000 रुपये पेन्शन हवे असेल तर तुम्हाला मासिक 84 रुपये जमा करावे लागतील. मासिक 3000 रुपये पेन्शनसाठी 126 रुपये, मासिक 4000 रुपये पेन्शनसाठी 168 रुपये गुंतवणूक करावी लागेल.

कर सवलत आणि अन्य लाभ :
या पेन्शन योजनेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभही मिळेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर सवलत दिली जाते. वास्तविक, यातून करपात्र उत्पन्न वजा केले जाईल. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभही उपलब्ध करून दिला जातो. म्हणजेच या योजनेत एकूण 2 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत दिली जाते.

योजनेतील अन्य तरतूद :
या अटल पेन्शन योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या एखाद्या गुंतवणूकदाराचा 60 वर्षापूर्वीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी/पती या योजनेत गुंतवणूक सुरू ठेवू शकतात आणि त्यांच्या वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा पेन्शन लाभ मिळवू शकतात. आणखी एक फायदा असा आहे की,मृत व्यक्तीची पत्नी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर संपूर्ण एकरकमी रकमेवर दावा करू शकते. जर पत्नीचाही मृत्यू झाला तर तिच्या नॉमिनीला संपूर्ण एकरकमी रक्कम दिली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips in Atal pension scheme for old age financial security and Tax Benefits on 24 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x