23 February 2025 8:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Investment Tips | धमाकेदार योजना, सुरक्षित गुंतवणूक आणि हमखास नफा, दीर्घकाळ गुंतवणुकीवर मिळेल 28 लाख रुपये परतावा

Investment tips

Investment Tips | जर तुम्हाला गुंतवणुकीत कोणतीही जोखीम न घेता नफा कमवायचा असेल तर एलआयसीची ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला LIC कडून हमखास 28 लाख रुपये परतावा मिळेल.

LIC जीवन प्रगती योजना:
LIC योजनेत ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. जर तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करून नफा कमवायचा असेल तर एलआयसीची योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. आपण ज्या योजनेची माहिती घेत आहोत, त्या योजनेचे नाव आहे, “जीवन प्रगती योजना”.या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 28 लाख रुपये परतावा कसा मिळेल हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

या योजनेत गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 200 रुपये जमा करावे लागतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना दररोज 200 रुपये म्हणजेच एका महिन्याला फक्त 6000 रुपये गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी पैसे गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर पूर्ण 28 लाखांचा नफा मिळेल. याशिवाय यामध्ये तुम्हाला लाईफ रिस्क कव्हरची सुविधा मिळेल.

1) जीवन प्रगती योजनेत नियमित पैसे भरावे लागेल.
2) या पॉलिसीमध्ये, तुम्हाला लाइफ कव्हर आणि डेथ बेनिफिट दिले जाईल, जे दर 5 वर्षांनी वाढते.
3) या पॉलिसीचा कालावधी किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.
4) या पॉलिसीमध्ये कमाल गुंतवणुकीची वय मर्यादा 45 वर्षे आहे.
5) यामध्ये गुंतवणुक रकमेची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
6) ही योजना नॉन-लिंक्ड, बचत आणि आर्थिक संरक्षणाचा लाभ देते.
7) यामध्ये तुम्हाला वार्षिक, त्रैमासिक आणि सहामाही आधारावर पैसे भरावे लागेल.

नॉमिनीला पैसे दिले जातात :
जर ठेवीदाराचा पॉलिसी चालू असतानाच मृत्यू झाला, तर पॉलिसीचे उरलेले पैसे त्याच्या नॉमिनीला मिळतात. LIC जीवन प्रगती योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठेवीदारांचे जोखीम कव्हर दर 5 वर्षांनी वाढते. म्हणजेच तुम्हाला मिळणारी रक्कम दर 5 वर्षात वाढते. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये फक्त 3 वर्षांसाठी पैसे गुंतवणूक केली आणि तुम्हाला नंतर पॉलिसी सरेंडर करायची असेल, तर पॉलिसीधारकाला सरेंडर शुल्क आकारले जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips in LIC Jeevan Pragati Yojna for long term benefits on 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x