23 January 2025 9:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Investment Tips | सुपरहिट गुंतवणूक योजना, 44 रुपये गुंतवणुकीवर मिळवा 27.60 लाखाचा परतावा, फायद्याच्या योजनेचा तपशील जाणून घ्या

Investment Tips

Investment Tips | LIC च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी फायदेशीर योजना बाजारात लाँच करत असते. LIC च्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. LIC ने एक विशेष योजना सुरू केली आहे, त्याचे नाव आहे “जीवन उमंग पॉलिसी”. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करून भविष्यात चांगला परतावा कमवू शकता आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा ही प्रदान करू शकता.

LIC जीवन उमंग पॉलिसी :
जीवन उमंग पॉलिसी LIC च्या इतर गुंतवणूक योजनांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी आहे. या पॉलिसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान मर्यादा 90 दिवस ते 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या वयोगटातील कोणीही भारतीय नागरिक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकता. LIC जीवन उमंग पॉलिसी ही एक एंडॉवमेंट स्कीम आहे. यामध्ये योजनेत, लाइफ इन्शुरन्स कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी व्याज परतावा रक्कम दिली जाते. मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या खात्यात एक ठराविक परतावा रक्कम जमा केली जाईल. दुसरीकडे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील वारसदार सदस्यांना किंवा नॉमिनीला एकरकमी विमा रक्कम दिली जाईल. या योजनेचे आणखी एक जबरदस्त वैशिष्ट्य म्हणजे यात गुंतवणूक केल्यास 100 वर्षांपर्यंतचे जीवन विमा कव्हरेज प्रदान केले जाते.

27.60 लाख परतावा कसा मिळवाल ?
एलआयसी च्या या जीवन विमा पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिन्याला 1302 रुपये प्रीमियम जमा केल्यास 15,298 रुपये गुंतवणूक रक्कम जमा होईल. जर तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करत राहिल्यास तुमची गुंतवणूक रक्कम 4.58 लाख रुपयांपर्यंत वाढेल. तुमच्या गुंतवणुकीवर 31 व्या वर्षापासून LIC तुम्हाला दरवर्षी 40 हजारांचा परतावा देईल. योजना सुरू केल्याच्या 31 वर्षे पासून ते 100 वर्षांपर्यंत LIC कडून तुम्हाला वार्षिक 40 हजारांचा म्हणजेच सुमारे 27.60 लाख रुपये परतावा दिला जाईल.

टर्म रायडरचाही लाभ :
LIC च्या या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याला टर्म रायडर बेनिफिट उपलब्ध असेल. या पॉलिसी मधील गुंतवणुकीवर बाजारातील जोखमीचा किंवा चढ उताराचा कोणताही परिणाम होत नाही. या पॉलिसीवर फक्त एलआयसीच्या नफा-तोट्याचा परिणाम होतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत तुम्हाला कर सवलत दिली जाईल. जर तुम्हाला LIC जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला किमान दोन लाख रुपयांची विमा पॉलिसी घ्यावी लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips on LIC Jeevan Umang Policy benefits on investment on 01 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x